Net Worth Of Lamine Yamal: फिफा वर्ल्डकप २०२६ स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आहे. या स्पर्धेतील क्वार्टर फायनलमध्ये जाणारे ८ संघ ठरले आहेत. या ८ संघांमध्ये बलाढ्य स्पेन संघाचाही समावेश आहे. स्पेनचा क्वार्टर फायनलचा सामना ११ जुलैला बेल्जियमविरुद्ध होणार आहे. स्पेनला फिफा वर्ल्डकप २०२६ स्पर्धा जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. स्पेनला इथपर्यंत पोहोचवण्यात १८ वर्षांच्या लामिन यामलचा देखील मोलाचा वाटा राहिला आहे. राईट विंगर म्हणून खेळणाऱ्या लामिनने आतापर्यंत १ गोल केला आहे. कमी वयात त्याने आपल्या खेळाच्या बळावर भरपूर प्रसिद्धी मिळवली आहे. दरम्यान लामिन यामलची एकूण संपत्ती किती आहे? जाणून घ्या.
लामिन यामलची एकूण संपत्ती किती?
फुटबॉल फायनान्स ट्रॅकरच्या वृत्तानुसार, २०२६ मध्ये १८ वर्षीय लामिन यामलची एकूण संपत्ती ५ मिलियन डॉलर्स ते ८ मिलियन डॉलर्सच्या घरात आहे. लामिन यामल हा एफसी बार्सिलोना संघाचं प्रतिनिधित्व करतो. या संघाकडून खेळण्यासाठी त्याला विक्रमी मानधन देण्यात आलं आहे. मे २०२५ मध्ये त्याने आपला २५ वा वाढदिवस साजरा केला. यादरम्यान त्याने एका करारावर सही केली. या करारानुसार, त्याला मे २०२५ पासून ते जून २०३१ पर्यंत एफसी बार्सिलोना संघाकडून खेळण्यासाठी एकूण १.१ बिलियन डॉलर्स इतकं मानधन दिलं जाणार आहे. मुख्य बाब म्हणजे तो केवळ १८ वर्षांचा आहे. इतक्या कमी वयात त्याने क्लबमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवलं आहे. या करारानुसार, लामिन यामलला दरवर्षी १८.२ मिलियन डॉलर्स इतकं मानधन मिळतं.
ब्रँड एंडोर्समेंट्स आणि इतर कमाई
लामिन यामल हा मैदानावरील कामगिरीसह ब्रँड एंडोर्समेंट्समधूनही कोटींची कमाई करतो. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी प्रसिद्ध ब्रँड अॅडिडासने लामिन यामलसोबत कोट्यवधींचा दीर्घकालील करार केला आहे. यासह तो अॅडिडाससोबत करार करणारा सर्वात युवा खेळाडू ठरला. यासह तो बीट्स बाय ड्रे कंपनीचा ग्लोबल ब्रँड अँबेसेडर आहे. मुख्य बाब म्हणजे, अनेक स्टार खेळाडू या ब्रँड्ससोबत जोडलेले आहेत. पण लामिन यामलला सर्वाधिक मानधन दिलं जातं. मार्केटिंग तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ब्रँड्स यामलकडे जागतिक फुटबॉलचा एक दीर्घकालीन चेहरा म्हणून पाहतात, ज्यामुळे त्याचे मूल्य दरवर्षी वाढत आहे.
लामिन यामल हा अतिशय गरिबीतून आणि कठीण परिस्थितीतून वर आलेला खेळाडू आहे. पण कमी वयात त्याने स्वत:ला सिद्ध केलं आहे. फुटबॉलच्या मैदानावर विंगर म्हणून खेळणाऱ्या लामिन यामलने कमी वयातच उंच भरारी घेतली आहे. ज्या स्तरावर पोहोचण्यासाठी खेळाडू वर्षानुवर्षे मेहनत घेतात, ते शिखर लामिन यामलने वयाच्या १८ व्या वर्षी आहे. पण हे यश असेच टिकवून ठेवायचे असेल, तर त्याला कामगिरीत सातत्य ठेवावे लागेल. येत्या काळात तो जगातील सर्वात महागडा फुटबॉलपटू ठरेल, यात शंका नाही.
