ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने टीम इंडियाच्या एका खेळाडूवर मोठे वक्तव्य केले आहे. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना या खेळाडूने आपल्या फलंदाजीत किरकोळ तांत्रिक बदल केले, त्यामुळे हा खेळाडू भारतासाठी प्रभावी फलंदाज बनू शकला, असे रिकी पाँटिंगचे म्हणणे आहे. हा खेळाडू यावेळी टीम इंडियाची पहिली पसंती राहिला आहे.

रिकी पाँटिंगने मोठं वक्तव्य केलं आहे

दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना किरकोळ तांत्रिक बदल करून अक्षर पटेलला भारताचा प्रभावी फलंदाज बनण्यास मदत कशी झाली हे रिकी पाँटिंगने उघड केले. आगामी आयपीएलमध्येही अक्षर आपली चांगली कामगिरी कायम ठेवेल, अशी आशा पाँटिंगला आहे. अक्षर पटेल सध्या बॉल आणि बॅटने टीम इंडियासाठी चांगली कामगिरी करत आहे. अलीकडेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याच्या बॅटने अनेक मोठ्या खेळी पाहायला मिळाल्या.

Rohit Sharma's reaction to Dhoni Karthik
MS Dhoni : ‘धोनी अमेरिकेला येत आहे पण…’, टी-२० विश्वचषकापूर्वी रोहित शर्माचा मोठा खुलासा
IPL 2024 Gujarat Titans vs Punjab Kings Match Updates in Marathi
IPL 2024: मुंबईकर शशांक ठरतोय पंजाब किंग्जचा तारणहार, जाणून घ्या त्याची आजवरची वाटचाल
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024 RCB vs LSG: “विराट कोहलीला आऊट करशील का?” मनिमरन सिध्दार्थने कोचला दिलेलं वचन केलं पूर्ण, पाहा VIDEO
Pooja Vastrakar's Controversial Post
पंतप्रधान मोदींची टीम वसूली टायटन्स! महिला क्रिकेटरच्या पोस्टने उडाली खळबळ, ट्रोल होताच मागितली माफी

हेही वाचा: WPL 2023, RCBW: सलग पाच पराभव होऊनही स्मृती मंधानाची RCB एलिमिनेटरसाठी कशी ठरेल पात्र ? जाणून घ्या समीकरण

रिकी पाँटिंग पुढे बोलताना म्हणाला की, “ भविष्यात अक्षर पटेलला कर्णधारापदाची मोठी संधी मिळू शकते पण त्यासाठी अजून खूप अवकाश आहे.” ऋषभ पंतच्या जागी डेव्हिड वॉर्नरकडे हंगामासाठी संघाची कमान सोपवण्यात आली आहे. ३६ वर्षीय वॉर्नरला टी२० लीगमध्ये कर्णधारपदाचा मोठा अनुभव आहे. त्याने ४ वर्षांहून अधिक काळ सनरायझर्स हैदराबादचे कर्णधारपद भूषवले आहे. हैदराबादने २०१६ मध्येही त्याच्या नेतृत्वाखाली विजेतेपद पटकावले होते. आयपीएल २०२१ मधील खराब कामगिरीमुळे त्याला संघातून वगळावे लागले. अखेर संघाने त्याला सोडून दिले. यानंतर दिल्ली कॅपिटल्सने त्याचा संघात समावेश केला. मात्र, कोपराला फ्रॅक्चर झाल्यामुळे वॉर्नर टीम इंडियाविरुद्धचे शेवटचे २ कसोटी सामने खेळू शकणार नाही. एकदिवसीय मालिकेसाठी त्याची निवड झाली असली तरी तो कितपत खेळेल याबाबत शंका आहे.

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये ताकद दाखवली

अक्षरने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेत तीन अर्धशतकांच्या मदतीने चार सामन्यांत २६४ धावा केल्या आणि विराट कोहली (२९७ धावा) नंतर तो भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला. रिकी पुढे म्हणाला की, “मी अक्षर पटेलला खूप दिवसांपासून ओळखतो आणि जेव्हा मी पहिल्यांदा तेव्हा तो संघातील तरुण खेळाडू होता. मला माहित होते की त्याच्याकडे फलंदाजीचे कौशल्य आहे पण गेल्या दोन वर्षांचा अपवाद वगळता तो आयपीएल किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर ते कौशल्य दाखवू शकला नाही.”

हेही वाचा: Ricky Ponting Home: अबब! रिकी पाँटिंगकडे किती पैसे आहेत… क्रिकेट खेळत नसतानाही खरेदी केले १५० कोटींचे घर, पाहा फोटो

अक्षरने तीन अर्धशतक ठोकले

अक्षरने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेत चार सामन्यांत तीन अर्धशतके झळकावली. त्याने ५५.६९ च्या स्ट्राइक रेटने आणि ८८ च्या सरासरीने एकूण २६४ धावा केल्या. तो विराट कोहली (२९७ धावा) नंतर भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू होता आणि मालिकेत एकूण तिसरा क्रमांक पटकावला होता. अक्षरने धावा करण्यासोबतच २.१६ च्या इकॉनॉमीसह तीन विकेट्सही घेतल्या.