scorecardresearch

Premium

IND vs AUS: अजिंक्य रहाणेच्या कसोटी कारकिर्दीबाबत रिकी पाँटिंगचे मोठे भाकीत, सांगितले फायनलनंतर संधी मिळेल की नाही?

India Vs Australia, WTC 2023 Final Updates: रिकी पाँटिंगने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या खेळीनंतर अजिंक्य रहाणेचे खूप कौतुक केले. त्याचबरोब केएल राहुल आणि श्रेयस अय्यर संघात परतल्यानंतर रहाणेच्या कारकिर्दीबद्दलही सांगितले.

India Vs Australia, WTC 2023 Final
रिकी पाँटिंग आणि अजिंक्य रहाणे (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Ricky Ponting’s big prediction on Ajinkya Rahane’s Test career: लंडनच्या ओव्हल स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात डब्ल्यूटीसी स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४६९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताला आपल्या पहिल्या डावात अजिंक्य रहाणेच्या खेळीच्या जोरावर २९६ धावा करता आल्या. ५१२ दिवसांनंतर संघात पुनरागमन करताना अजिंक्य रहाणे पहिल्या डावात महत्त्वाची भूमिका बजावली. आता अजिंक्य रहाणेच्या कसोटी कारकिर्दीबाबत रिकी पाँटिंगने एक मोठे भाकीत केले आहे.

अजिंक्य रहाणेने पहिल्या डावात टीम इंडियासाठी सर्वाधिक ८९ धावा केल्या होत्या, पण रहाणेच्या या उत्कृष्ट फलंदाजीनंतर श्रेयस अय्यर संघात परतल्यावर तो भारतीय संघात असेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर कांगारूंचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने रहाणेला भारतीय कसोटी संघात स्थान मिळेल की नाही हे भाकित केले.

Gutami sai mrunmayi
गौतमी देशपांडे ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याला करतेय डेट? सई ताम्हणकरच्या कमेंटवर उत्तर देत मृण्मयी म्हणाली…
gang rape
संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
Ajit Pawar on Sharad Pawar Praful Patel Photo
पक्षातील बंडखोरीनंतरही शरद पवार आणि प्रफुल्ल पटेलांचा एकत्र फोटो, चर्चांना उधाण, अजित पवार म्हणाले…

आयसीसीशी बोलताना रिकी पाँटिंग म्हणाला की, रहाणेने मिळालेल्या संधीचा पुरेपूर उपयोग केला पाहिजे आणि तुम्ही एवढेच करू शकता. मला वाटतं केएल राहुल आणि श्रेयस अय्यर भारतीय कसोटी संघात परत येईपर्यंत भारताला वेस्ट इंडिजविरुद्ध आणखी दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. या दोन कसोटींमुळे त्याला त्याची कसोटी कारकीर्द आणखी काही वर्षे लांबवण्याची मोठी संधी मिळाली आहे.

हेही वाचा – IND vs AUS: “देव अक्कल वाटत होता तेव्हा…”; पाकिस्तानच्या माजी खेळाडूची राहुल द्रविडवर सडकून टीका

अजिंक्य एक सर्वात शिस्तप्रिय क्रिकेटर –

रहाणे आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला असून रिकी पाँटिंग या संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. रिकी म्हणाला की तो खूप नम्र आहे आणि मी ज्यांच्यासोबत काम केले आहे, त्यापैकी एक सर्वात शिस्तप्रिय क्रिकेटर आहे. तो सराव सत्रात सर्वात पहिल्यांदा पोहोचणाऱ्या पहिल्या खेळाडूंपैकी एक आहे. तो रिकव्हरी आणिल रिहॅबसाठी जिममध्ये पोहोचणाऱ्या पहिल्या खेळाडूंपैकी एक आहे. रिकी म्हणाला की, रहाणेला कसोटी फॉर्मेटमध्ये खेळताना पाहून मला खूप आनंद होतो आणि जेव्हा तुम्ही त्याला (ऑस्ट्रेलियाविरुद्ध) अशा प्रकारे खेळताना पाहता, तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल की तो गेल्या काही वर्षांपासून या भारतीय संघात का नाही?

पाँटिंग म्हणाला की आधुनिक खेळात आयपीएलमधील काही चांगल्या कामगिरीच्या जोरावर तो भारतीय कसोटी संघात परतला आणि खूप चांगला खेळला हे आश्चर्यकारक नाही. दुसरीकडे, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर संघात आल्यावर रहाणेचे काय होईल, रिकी म्हणाला की मी भाग्यवान आहे की मी भारतीय क्रिकेट संघाचा निवडकर्ता नाही. कारण हा निर्णय खूप कठीण असेल. कदाचित निवड ही परिस्थितीचा आधार असू शकते, परंतु रहाणे लयीत आहे हे भारतासाठी चांगले आहे

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-06-2023 at 18:45 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×