Rinku Singh Record in LSG vs KKR Match: आयपीएलमधील लखनौ सुपर जायंट्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करत रिंकू सिंहने इतिहास घडवला. रिंकू सिंहने यंदाच्या आयपीएलमधील सलग दुसऱ्या सामन्यात केकेआरला पराभवापासून वाचवलं आहे. केकेआरचा उपकर्णधार रिंकू सिंग ६.१ षटकांत ४ बाद ३१ धावा अशी संघाची स्थिती असताना फलंदाजीला आला. त्या वेळी संघ पूर्णपणे दबावाखाली होता. मात्र रिंकूने जबाबदारी स्वीकारत शानदार खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे.
रिंकू सिंहने खेळपट्टीला साजेशी सावध खेळी केली आणि मैदानावर टिकून राहिला. एका टोकाकडून सातत्याने विकेट्स जात होते, पण दुसऱ्या टोकाला मात्र रिंकू पाय घट्ट रोवून उभा होता. रिंकू या सामन्यात ५१ चेंडूत ७ चौकार व ५ षटकारांच्या मदतीने ८३ धावांची निर्णायक खेळी केली. रिंकूच्या या दमदार खेळीमुळे केकेआरने १५५ धावांपर्यंत मजल मारली, जो त्या परिस्थितीत अत्यंत स्पर्धात्मक स्कोअर ठरला. नंतर सुपर ओव्हरमध्ये केकेआरने सामना जिंकत हा विजय आपल्या नावावर केला.
रिंकू सिंहने इतिहास घडवला
केकेआरला तोडीस तोड टक्कर देण्यासाठी १५०-१६० धावसंख्या उभारण्याची गरज होती. रिंकू फलंदाजीला होता, अखेरच्या षटकात आता किती धावा करता येणार, यावर सर्वांच्या नजरा होत्या. या षटकात रिंकूने सलग ४ षटकार खेचले, यासह संघ १५५ धावांपर्यंत मजल मारू शकला. रिंकू सिंह हा २०व्या षटकात दोन वेळा षटकारांची आतिषबाजी करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे.
रिंकूची ८३ धावांची खेळी ही आयपीएल इतिहासात पाचव्या क्रमांकावर किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर येऊन केलेल्या सर्वाधिक धावांमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. तसेच, केकेआरसाठी ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च खेळी ठरली. या यादीत आंद्रे रसेल अजूनही अव्वल स्थानावर आहे.
आयपीएल डावाच्या २०व्या षटकात सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू
रवींद्र जडेजा – ५ षटकार वि. हर्षल पटेल, आरसीबी
रिंकू सिंह – ५ षटकार वि. यश दयाल, जीटी
युवराज सिंग – ४ षटकार वि. राहुल शुक्ला, दिल्ली
हार्दिक पंड्या – ४ षटकार वि. अशोक दिंडा, पुणे<br>श्रेयस अय्यर – ४ षटकार वि. शिवम मावी, केकेआर
जोफ्रा आर्चर – ४ षटकार वि. लुंगी एनगिडी, सीएसके
ऋषभ पंत – ४ षटकार वि. मोहित शर्मा, जीटी
रोमारियो शेफर्ड – ४ षटकार वि. एनरिक नॉर्किया, डीसी
अब्दुल समद – ४ षटकार वि. संदीप शर्मा, आरआर
मार्कस स्टॉयनिस – ४ षटकार वि. मोहम्मद शमी, हैदराबाद
शेरफन रूदरफोर्ड – ४ षटकार वि. रोमारियो शेफर्ड, आरसीबी
रिंकू सिंह – ४ षटकार वि. दिग्वेश राठी, लखनौ
