News Flash

अंकित शर्मा

कझाकिस्तानमध्ये ८.१७ मीटर लांब उंडी उडी मारून आतापर्यंतचे अनेक राष्ट्रीय विक्रम

कझाकिस्तान इथे झालेल्या पात्रताफेरीत ८.१७ मीटर लांब उंच उडी मारत अंकितने आतापर्यंतचा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला

वय : २४

स्पर्धा : उंच उडी (लाँग जम्प)

स्पर्धा (तारिख): १३ ऑगस्ट

कझाकिस्तान उपांत्यफेरीत राष्ट्रीय विक्रम मोडत रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत धडक

सर्वोत्तम कामगिरी : दोनदा राष्ट्रीय विजेता, राष्ट्रकुल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक

कझाकिस्तानमध्ये ८.१७ मीटर लांब उंडी उडी मारून आतापर्यंतचे अनेक राष्ट्रीय विक्रम मोडत चर्चेत असलेले नाव म्हणजे अंकित शर्मा. आग्राच्या पिनहत गावात अंकितचा जन्म झाला. कझाकिस्तान इथे झालेल्या पात्रताफेरीत ८.१७ मीटर लांब उंच उडी मारत त्याने आतापर्यंतचा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला. गेल्यावर्षी केरळमध्ये झालेल्या राष्ट्रीय खेळात त्याने ८ मीटर उंच उडी मारण्याचा विक्रम केला होता. गेल्या २७ वर्षांपासून दक्षिण आशियायी खेळात पाकिस्तानचा ७.८९ लांब उडी मारण्याचा विक्रम अंकितने मोडून काढला आहे. रिओ ऑलिम्पिकसाठी अंकित पात्र झाला असला तरी येथील स्पर्धेत त्याच्यापुढे अत्यंत कठीण आव्हान असणार आहे. कझाकिस्तान उपांत्यफेरीत उत्तम कामगीरी केल्यामुळे उंच उडी मारणा-या जागतिक खेळाडूंमध्ये त्याचे नाव देखील समाविष्ट झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2016 3:13 pm

Web Title: ankit sharma
Next Stories
1 लिएंडर पेस
2 संदीप तोमर
3 नरसिंग यादव
Just Now!
X