News Flash

नवलाई : ‘सुरक्षा’रक्षक!

पुरुषांसाठी ३.५० लाख निरोधाचे वाटप करण्यात आले आहे.

रिओ ऑलिम्पिक स्पध्रेत आयोजकांनी आत्तापर्यंत साडेचार लाख निरोधांचे वाटप केले आहे. यापैकी महिलांसाठी एक लाख, तर पुरुषांसाठी ३.५० लाख निरोधाचे वाटप करण्यात आले आहे. एक लाख ७५ हजार वंगणाची पाकिटेही वाटली आहेत.

रिओ ऑलिम्पिक स्पध्रेत खेळाडूंच्या सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. लाखाच्या संख्येत जवान आणि हजारोंच्या संख्येत सुरक्षारक्षकांची फौज ऑलिम्पिक स्पध्रेसाठी अहोरात्र तैनात करण्यात आलेली आहे, तरीही खेळाडूंना बंदुकीच्या धाकावर लुटणे, ऑलिम्पिक नगरीतून महाग वस्तूंची चोरी होणे, आदी गैरप्रकार घडतच आहेत. मग खेळाडूंच्या सुरक्षेसाठी तैनात केलेले जवान-सुरक्षारक्षक आहेत तरी कुठे, हा प्रश्न पडणे साहजिकच आहे. एकीकडे बंदूकधारी सुरक्षारक्षकांबाबत खेळाडूंमध्ये नाराजीचा सूर आहे. दुसरीकडे असा एक सुरक्षारक्षक आहे, की जो केवळ खेळाडूंच्याच नव्हे, तर क्रीडाप्रेमींच्या चर्चेचा विषय बनला आहे. लूटमारीपासून खेळाडूंना वाचवण्यात अपयशी ठरलेल्या जवानांच्या तुलनेत हा रक्षक ‘एड्स’ या जीवघेण्या आजारापासून खेळाडूंची रक्षा करीत आहे.

ऑलिम्पिक स्पर्धेच्या वार्ताकनासाठी रिओत दाखल झालेल्या क्रीडा पत्रकाराने एरिकनामक  व्यक्तीचे छायाचित्र ‘ट्विटर’वर टाकले आणि अल्प कालावधीत एरिक ऑलिम्पिकमध्ये प्रकाशझोतात आला. ‘निरोध’ची पाकिटे असलेली भली मोठी प्लॅस्टिकची पिशवी गळ्यात टांगून एरिक ऑलिम्पिकनगरीतील प्रत्येक खेळाडूला सुरक्षित समागम करण्याचा सल्ला देत आहे.

१९८८च्या सेऊल ऑलिम्पिक स्पध्रेपासून खेळाडूंना निरोधवाटपाची सुरुवात झाली. स्पध्रेदरम्यान खेळाडूची कामवासना जपली जावी आणि त्याला कोणत्याही प्रकारचा संसर्गजन्य रोग होऊ नये, यासाठी निरोधवाटपाची सुरुवात झाली. सेऊलनंतर झालेल्या प्रत्येक ऑलिम्पिक स्पध्रेत तसे निरोधाचे वाटप होते, परंतु प्रत्येक वेळी मशीनमध्ये असलेले निरोध खेळाडूला स्वत:हून जावून घ्यावे लागत होते. त्यामुळे कदाचित अनेक खेळाडू निरोध वापरणे टाळत होते. रिओमध्ये हे प्रकार टाळण्यासाठी आयोजकांनी अनोखी शक्कल लढवली. त्यांनी खेळाडूंना थेट निरोध मिळावेत यासाठी एरिकची नियुक्ती केली.

निरोधाची पाकिटे असलेली प्लॉस्टिक पिशवी गळ्यात टांगून एरिक स्पर्धेच्या ठिकाणी खेळाडूंना निरोधाचे वाटप करीत आहे. याची बातमी करण्याचा एका पत्रकाराने प्रयत्न केला, परंतु एरिक इतका व्यस्त होता की त्याच्याशी बोलताच आले नाही. त्यामुळे या पत्रकाराने एरिकचे कर्तव्यावर असलेले छायाचित्र समाजमाध्यमावर टाकले. छायाचित्राखाली त्याने लिहिले की, ‘‘ऑलिम्पिक स्पर्धेच्या ठिकाणी फिरून

खेळाडूंना निरोधवाटप करणारा एरिक पाहा!’’ त्या पत्रकाराच्या या हौशी उद्योगाला काही क्षणातच जगभरातून दाद मिळाली. अर्थात सर्वाच्या नजरेत निरोधवाटप करणारा एरिक प्रसिद्ध झाला. जवळपास ९, ३०९ लोकांनी पत्रकाराच्या या ‘ट्वीट’ला ‘रिट्विट’ करीत दाद दिली, तर ११ हजारांहून अधिकांनी त्याला ‘लाइक्स’ केले. काहींनी तर एरिक किती महत्त्वाचे काम करीत आहे, असा संदेश पाठवून त्याला शुभेच्छा दिल्या. एरिकच्या छायाचित्राला इतका चांगला प्रतिसाद मिळेल, असे पत्रकाराला स्वप्नातही वाटले नव्हते. ऑलिम्पिक स्पर्धामध्ये खेळाडूंच्या विक्रमांची चर्चा होत असताना या ‘सुरक्षा’रक्षकाने सर्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. ४,५०,०००

chart

swadesh.ghanekar@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2016 4:00 am

Web Title: condoms in rio 2016
Next Stories
1 महिलांचे बॉक्सिंग अद्यापही उपेक्षितच
2 सिमोन बिलेसचे विश्वविक्रमाचे स्वप्न भंगले
3 Rio 2016: …आणि तिने झेप मारून जिंकले सुवर्ण!
Just Now!
X