23 February 2019

News Flash

Rio 2016: मायदेशी परतलेल्या दीपा कर्माकरचे उत्साहात स्वागत

दीपा कर्माकर हिची देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार अर्थात राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

rio 2016 : आता पुढील ऑलिम्पिकसाठी तयारी सुरू करणार असून भारताला पदक मिळवून देणे माझे लक्ष्य असेल. मी आठवडाभरासाठी माझ्या आई-वडिलांसोबत राहणार असून आईने बनवलेल्या पदार्थांचा आस्वाद घेणार असल्याचे दीपाने सांगितले.

ऑलिम्पिक स्पर्धेत जिम्नॅस्टिक प्रकारात अंतिम फेरीत धडक मारत इतिहास घडवणारी दीपा कर्माकर शनिवारी सकाळी भारतात परतली. यावेळी आगरतळा विमानतळावर दिपाचे स्वागत करण्यासाठी हजारो क्रीडाप्रेमींची गर्दी जमली होती. दिपा आणि तिचे प्रशिक्षक बिश्वेश्वर नंदी यांच्या स्वागतासाठी राज्यातील क्रीडा पदाधिकारीदेखील जातीने हजर होते. यावेळी दीपाने म्हटले की, आता पुढील ऑलिम्पिकसाठी तयारी सुरू करणार असून भारताला पदक मिळवून देणे माझे लक्ष्य असेल. मी आठवडाभरासाठी माझ्या आई-वडिलांसोबत राहणार असून आईने बनवलेल्या पदार्थांचा आस्वाद घेणार असल्याचे दीपाने सांगितले.
दीपा कर्माकरच्या राज्यात…
त्रिपुराच्या दीपाने ऑलिम्पिकमध्ये जागतिक स्तरावरील अव्वल जिम्नॅस्टपटूंना टक्कर देत ‘प्रोडय़ुनोव्हा’ हा कठीण प्रकार सादर केला. तिचे पदक अवघ्या काही गुणांनी हुकले होते. ऑलिम्पिकमध्ये मी सातवे किंवा आठवे स्थान मिळवेन, याची मला खात्री होती. मात्र, चौथ्या स्थानापर्यंत पोहचता आले, याचा मला खूप आनंद असल्याचेही दीपाने म्हटले.
दीपा कर्माकर हिची देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार अर्थात राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. मात्र, ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवता आले असते तर हा पुरस्कार स्विकारताना जास्त आनंद वाटला असता, अशी प्रतिक्रिया यावेळी दीपाने व्यक्त केली.
Rio 2016: मला घरी जाऊन रसगुल्ले खायचे आहेत- दीपा कर्माकर

First Published on August 20, 2016 10:06 am

Web Title: dipa karmakar gets a grand welcome in agartala after rio qualification