26 January 2021

News Flash

भारतीय खेळाडू


रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताकडून एकूण १२१ खेळाडूंचा यंदा समावेश असणार आहे. बॅडमिंटन, बॉक्सिंग, हॉकी, गोल्फ, तिरंदाजी, अॅथलेटिक्स, जिम्नॅस्टिक, जूडो, नौकायन, नेमबाजी, जलतरण, टेबल टेनिस, टेनिस, वेट लिफ्टिंग आणि कुस्ती या खेळांतील खेळाडूंचा समावेश आहे. भारताचे सर्व खेळाडू उत्तम तयारीनिशी स्पर्धेत उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. यंदा भारताला कमीत कमी १० पदकांची अपेक्षा आहे. भारताकडून यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये दीपिका कुमारी(तिरंदाजी), दुती चंद(अॅथलेटिक्स), टिंटू लुका(अॅथलेटिक्स), सायना नेहवाल(बॅडमिंटन), किदम्बी श्रीकांत(बॅडमिंटन), शिवा थापा(बॉक्सिंग), अभिनव बिंद्रा (नेमबाजी), जीतू रॉय(नेमबाजी), गगन नारंग (नेमबाजी), अपूर्वी चंदेला(नेमबाजी), योगेश्वर दत्त(कुस्ती), विनेश फोगट (कुस्ती) हे पदकांची कमाई करतील अशी अपेक्षा आहे. अभिनव बिंद्रा, सायना नेहवाल, जीतू रॉय, गगन नारंग, योगेश्वर दत्त यांनी ऑलिम्पिक पदं जिंकलेली आहेत. भारताकडून ऑलिम्पिकसाठी निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे प्रोफाईल तुम्हाला येथे पाहता येईल. चाहत्यांना या खेळाडूंकडून खूप अपेक्षा आहेत.

Just Now!
X