News Flash

कविता राऊत

हाफ मॅरेथॉन स्पर्धा कविताने १ तास १२ मिनिटे ५० सेकंदात पूर्ण केली होती.

Kavita Raut, winners of the Half Mumbai Marathon 2015 at the finishng line at CST on Sunday. Express Photo by Kevin D'Souza. 18.01.2015. Mumbai.

वय : ३१

स्पर्धा :
मॅरेथॉन

स्पर्धेची तारीख: १४ ऑगस्ट

विक्रम: हाफ मॅरेथॉनचा राष्ट्रीय विक्रम कविता राऊतच्या नावावर आहे. हाफ मॅरेथॉन कविताने १ तास १२ मिनिटे ५० सेकंदात पूर्ण केली होती.

सर्वोत्तम कामगिरी : २०१० साली कॉमनवेल्थ गेम्समध्ये कांस्य पदक आणि याच साली झालेल्या आशियाई स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई.

कविता राऊत ही मूळची नाशिकची. दहा किमीचे अंतर ३४ मिनिटे ३२ सेकंदात पार केल्याच्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद कविताच्या नावावर आहे. हाफ मॅरेथॉनचा राष्ट्रीय विक्रम देखील कविताच्याच नावावर आहे. हाफ मॅरेथॉन स्पर्धा कविताने १ तास १२ मिनिटे ५० सेकंदात पूर्ण केली होती. रिओ ऑलिम्पिकमध्ये ओपी जैशा आणि सुधा सिंग यांच्यासोबत कविता राऊत मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होताना दिसेल. कॉमनवेल्थ गेम्समध्ये पदकाची कमाई करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू म्हणून कविताचे नाव घेतले जाते. कॉमनवेल्थ गेम्समध्ये कविताने कांस्य पदकाची कमाई केली होती. कविताकडून आजवर सातत्यपूर्ण कामगिरी पाहायला मिळाली आहे. क्रीडा क्षेत्रातील अर्जुन पुरस्कार आणि सुवर्णरत्न पुरस्काराने तिला सन्मानित करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2016 5:56 pm

Web Title: kavita raut
Next Stories
1 नितेंद्र सिंह रावत
2 अंकित शर्मा
3 लिएंडर पेस
Just Now!
X