News Flash

Rio 2016: किदम्बी श्रीकांतचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात

लिन डॅनचे आव्हान किदम्बीसाठी खडतर

Kidambi Srikanth vs Lin Dan Live Score Rio Olympics 2016 Live Commentary and match updates

रिओ ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन स्पर्धेत पुरूषांच्या वैयक्तिक गटात भारतीय बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांत याचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. चीनचा सुप्रसिद्ध खेळाडू लिन डॅनविरुद्ध किदम्बीला पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, उपांत्यपूर्व फेरीची ही लढत अत्यंत चुरशीची झाली. लिन डॅनने सामना २१-६, ११-२१, २१-१८ असा जिंकला. पहिल्या सेटमध्ये किदम्बी श्रीकांतला ६-२१ असा दारुण पराभव पत्करावा लागला. त्यामुळे हा सामना चीनचा लिन डॅन एकहाती जिंकणार असेच चित्र होते. मात्र, दुसऱया सेटमध्ये किदम्बी आपल्या दमदार स्मॅशच्या आणि अप्रतिम खेळीच्या जोरावर पुनरागमन केले. किदम्बीने दुसराने सेट २१-११ असा जिंकून सामना तिसऱया निर्णायक सेटपर्यंत नेला. तिसऱया सेटमध्येही किदम्बीने चीनच्या लिन डॅनला कडवी झुंज दिली. तिसऱया सेटमध्ये १५ व्या गुणापर्यंत किदम्बी श्रीकांत आघाडीवर होता, पण लिन डॅनने आपल्या अनुभवाच्या जोरावर सामन्याच्या अखेरच्या क्षणी आघाडी घेऊन तिसरा सेट २१-१८ असा जिंकला.
किदम्बीच्या या पराभवासह त्याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. मात्र, जागतिक क्रमवारीत आपल्यापेक्षा आघाडीच्या स्थानावर असलेल्या अनुभवी लिन डॅनला किदम्बीने अखेरच्या सेटपर्यंत झुंजत ठेवले. त्यामुळे उपस्थितांनी किदम्बीलाही उपस्थित भारतीय चाहत्यांनी टाळ्यांनी प्रतिसाद दिला.

LIVE UPDATE: 

# चुरशीच्या लढाईत लिन डॅनने मारली बाजी, तिसरा सेट २१-१८ ने जिंकून स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश

# तिसऱया आणि निर्णायक सेटमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये अत्यंत चुरशीची लढत

# तीन गुणांची पिछाडी किदम्बीने दमदार स्मॅशने मोडून काढली, सामना १४-१४ असा बरोबरीत

# किदम्बी आता तीन गुणांनी पिछाडीवर, १३-१०

# लिन डॅनकडे ९-८ अशी एका गुणाची आघाडी

# तिसऱया सेटमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये गुणांसाठी चुरस

# तिसऱया सेटमध्ये लिन डॅन ६-४ ने आघाडीवर

# किदम्बीचेही तोडीस तोड प्रत्युत्तर, तिसऱया सेटमध्ये केवळ दोन गुणांचा फरक

# तिसऱया सेटमधला पहिला गुण चीनच्या लिन डॅनच्या खात्यात.

# तिसऱया सेटला सुरूवात.

# सामन्याच्या तिसऱया निर्णायक सेटमध्ये किदम्बी श्रीकांत दमदार कामगिरी करणार का?

# किदम्बी श्रीकांतने दुसरा सेट २१-११ असा जिंकला.

# किदम्बी श्रीकांतने पहिला सेट ६-२१ ने गमावल्यानंतर, दुसरा सेटमध्ये दमदार पुनरागमन केले.

# श्रीकांतचा शानदार स्मॅश, १९-१० ने श्रीकांत आघाडीवर

# श्रीकांतकडे दुसऱया सेटमध्ये १५-७ अशी आघाडी

# पहिल्या सेटमध्ये दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर दुसऱया सेटमध्ये श्रीकांतची दमदार कामगिरी

# दुसऱया सेटमध्ये श्रीकांतची चांगली सुरूवात, ३-० गुणांची आघाडी

# किदम्बी श्रीकांतने पहिला सेट २१-६ ने गमावला.

# बऱयाच वेळानंतर किदम्बीला गुण मिळविण्यात यश, किदम्बीची १२-२ ने आघाडी.

# लिन डॅनकडून शानदार खेळी, ९-१ ने दमदार आघाडी.

# पहिल्या सेटमध्ये लिन डॅनची ६-१ ने आघाडी.

# लिन डॅनचे दमदार स्मॅश, किदम्बी निष्प्रभ

# सामन्याला सुरूवात

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2016 6:21 pm

Web Title: kidambi srikanth vs lin dan live score rio olympics 2016 live commentary and match updates
Next Stories
1 Rio 2016: पी.व्ही.सिंधूच्या वडिलांनी मुलीसाठी ८ महिन्यांची सुटी घेतली!
2 Rio 2016: मला घरी जाऊन रसगुल्ले खायचे आहेत- दीपा कर्माकर
3 दीपा कर्माकरची खेलरत्नसाठी शिफारस
Just Now!
X