News Flash

ललिता बाबर

रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या ललिताने ९ मिनिटे, २७.०९ सेकंदांत शर्यत पूर्ण केली होती.

Lalita Babar broke her own national record with a timing of 9:27.09 seconds at the Federation Cup. (File photo)

वय: २७

स्पर्धा : ३००० मीटर स्टीपलचेस

स्पर्धेची तारीख: १३ ऑगस्ट

विक्रम: २०१५ साली आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्ण पदक. आणि २०१४ सालच्या आशियाई स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई

सर्वोत्तम कामगिरी: तीन वेळेस मुंबई मॅरेथॉनचे विजेतेपद

रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या महाराष्ट्राच्या ललिता बाबरने दिल्ली येथे सुरू असलेल्या फेडरेशन चषक राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ३००० मी. स्टीपलचेस प्रकारात स्वत:चाच विक्रम मोडत नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली होती. रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या ललिताने ९ मिनिटे, २७.०९ सेकंदांत शर्यत पूर्ण केली होती. ललिता ही महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील मोही गावची असून, तिला आपल्या खेडेगावात शाळेत जाताना दररोज ४ किमी अंतर चालत कापावे लागत असे. येथूनच तिच्या करिअरच्या प्रवासाला सुरूवात झाली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. खडतर आव्हानांना तोंड देऊन यशोशिखर गाठलेल्या ललिताने सुप्रसिद्ध मुंबई मॅरेथॉन स्पर्धा जिंकण्याची हॅट्ट्रीक साधली आहे. ही स्पर्धा सर्वात कमी वेळात म्हणजेच दोन तास ५० मिनिटे आणि ३१ सेकंदात पूर्ण करण्याचा विक्रम देखील तिच्याच नावावर आहे. धावण्याच्या स्पर्धेनंतर तिने आपले लक्ष स्टीपलचेस प्रकारावर केंद्रीत केले. दक्षिण कोरियात झालेल्या आशियाई स्पर्धेत तिला यश देखील आले. ललिताने ३००० मी. स्टीपलचेस प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई केली. रिओ ऑलिम्पिकमध्ये ललिताकडून महाराष्ट्रासह भारताला पदकाची आशा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2016 8:19 pm

Web Title: lalita babar women 3000m steeplechase athletics
Next Stories
1 टिंटू लूका
2 कविता राऊत
3 नितेंद्र सिंह रावत
Just Now!
X