scorecardresearch

ध्यानचंद ते अभिनव बिंद्रा…ऑलिम्पिक उदघाटन सोहळ्यात देशाचे नेत्तृत्व केलेले खेळाडू

आपल्या देशाच्या खेळाडूंच्या पथकाचे नेतृत्त्व करण्याची संधी मिळणे म्हणजे मानाची गोष्ट असते

ध्यानचंद ते अभिनव बिंद्रा…ऑलिम्पिक उदघाटन सोहळ्यात देशाचे नेत्तृत्व केलेले खेळाडू
Rio Olympics 2016 : नेमबाज अभिनव बिंद्रा ब्राझीलच्या मराकाना स्टेडियमवर होणाऱया उदघाटन सोहळ्यात भारतीय चमूचे नेतृत्त्व करताना दिसेल.

क्रीडा जगतात सर्वात प्रतिष्ठेच्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या उदघाटन सोहळ्यात प्रत्येक देशाच्या खेळाडूंच्या पथकाची परेड होते. आपल्या देशाच्या खेळाडूंच्या पथकाचे नेतृत्त्व करण्याची संधी मिळणे म्हणजे मानाची गोष्ट असते. १९२० सालापासून ते आजवर अनेक नामांकीत भारतीय खेळाडूंनी ऑलिम्पिक स्पर्धेत तिरंगा हाती घेऊन देशाचे नेत्तृत्व केले आहे.

यंदाच्या रिओ ऑलिम्पिक २०१६ मध्ये भारताचा नेमबाज अभिनव बिंद्रा ब्राझीलच्या मराकाना स्टेडियमवर होणाऱया उदघाटन सोहळ्यात भारतीय चमूचे नेतृत्त्व करताना दिसेल. अॅथलिट पुर्मा बॅनर्जी यांनी १९२० सालच्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या उदघाटन सोहळ्यात पहिल्यांदा भारताचे नेतृत्त्व केले होते. त्यानंतर सुरू झालेला हा मानचा सिलसिला आजवर कायम असून विविध खेळाडूंना हा मान मिळाला आहे.

ऑलिम्पिक स्पर्धेच्या उदघाटन सोहळ्यात भारतीय चमूचे नेतृत्त्व केलेले खेळाडू-

 • २०१६ – अभिनव बिंद्रा
 • २०१२ – सुशील कुमार
 • २०१० – शिवा केशवन
 • २००८ – राज्यवर्धन राठोड
 • २००६ – नेहा अहुजा
 • २००४ – अनुज जॉर्ज
 • २००२ – शिवा केशवन
 • २००० – लिएण्टर पेस
 • १९९८ – शिवा केशवन
 • १९९६ – प्रगत सिंग
 • १९९२ – शिनी अब्राहम-विल्सन
 • १९८८ – कर्तार सिंग
 • १९८४ – जाफर इक्बाल
 • १९७२ – डी.एन.जोन्स
 • १९६४ – गुरबच्चन सिंग रंधवा
 • १९५६ – बलबिर सिंग
 • १९५२ – बलबिर सिंग
 • १९३६ – ध्यानचंद
 • १९३२ – लाल शहा बोखारी
 • १९२० – पुर्मा बॅनर्जी

मराठीतील सर्व रिओ २०१६ ऑलिम्पिक ( Rio-2016-olympics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: List of flag bearers for india at the olympics

ताज्या बातम्या