23 February 2019

News Flash

India wrestling, Babita Kumari, Rio 2016 Olympics: बबिता कुमारीला पहिल्याच सामन्यात पराभवाचा धक्का

बबिताने आपले नाणे खणखणीत वाजवून दाखवले आहे

Live India Wrestling, Babita Kumari, Rio 2016 Olympics: Babita Kumari looks to continue the good run on the mat. (Express File photo by RAVI KANOJIA)

भारताची महिला कुस्तीपटू बबिता कुमारी हिला पहिल्याच सामन्यात पराभवाचा धक्का बसला. बबिता कुमारीचा ५३ किलो वजनी गटात ग्रीसच्या मारियाने ५-१ असा पराभव केला. मारियाकडून स्विकाराव्या लागलेल्या पराभवानंतरही बबिता कुमारीचे स्पर्धेतील आव्हान मारियाच्या पुढील सामन्यावर अवलंबून होते. मारियाने पुढील सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला असता, तर बबिता कुमारीला कांस्य पदकासाठीचा सामना खेळण्याची संधी चालून आली असती. मात्र, मारियाने तिचा पुढचा सामना गमावला आणि बबिताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
साक्षी मलिकने ५८ किलो वजनी गटात भारतासाठी कांस्य पदकाची कमाई करून दिल्यानंतर बबिता कुमारीकडूनही पदकाच्या आशा होत्या. बबिताची बहिण विनेश फोगट देखील उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचली होती. पण उपांत्यपूर्व फेरीत झालेल्या गंभीर दुखापतीमुळे तिला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. याची परतफेड म्हणून बहिण बबिता कुमारी स्पर्धेत चांगली कामगिरी करून महिला कुस्तीमध्ये भारताला आणखी एक पदक जिंकून देईल अशी अटकळ होती. पण बबिताने निराशा केली. सामन्यात ग्रीसच्या मारियाचीच पकड पाहायला मिळाली.

Live India Wrestling:

# ग्रीसच्या मारियाने तिचा पुढील सामना गमावल्याने बबिताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात

# बबिताविरुद्धचा सामना जिंकलेल्या ग्रीसच्या मारियाने अंतिम फेरीत प्रवेश मिळविल्यास बबिताला पुढील सामना खेळता येणार.

# बबिता कुमारीने पहिलाच सामना गमावला असला तरी तिचे स्पर्धेतील भवितव्य प्रतिस्पर्धी खेळाडूवर अवलंबून आहे.

# बबिता कुमारीने पहिलाच सामना ५-१ असा गमावला.

# मारियाच्या खात्यात आणखी दोन गुण, भारत १-५ ग्रीस

# बबिताने खाते उघडले, भारत १-३ ग्रीस

# ग्रीसच्या मारिआने घेतली तीन गुणांची आघाडी, बबिता कुमारीला खाते उघडण्यात अद्याप अपयश

# बबिता कुमारीच्या सामन्याला सुरूवात, पहिला गुण ग्रिसच्या कुस्तीपटूच्या खात्यात

First Published on August 18, 2016 7:12 pm

Web Title: live india wrestling babita kumari women freestyle medal video streaming day 13