News Flash

नरसिंग यादव

नरसिंग यादवने ऑलिम्पिकसाठीचा प्रवास खडतर असा होता

भारताला कुस्तीमध्ये दोन ऑलिम्पिक पदके मिळवून देणाऱ्या सुशील कुमारला डावलून नरसिंगला प्रवेशिका देण्यात आली.

वय: २६

खेळ प्रकार- कुस्ती (७४ किलो फ्री स्टाईल, पुरुष)

सामन्याची तारीख: १९ ऑगस्ट

पात्रता फेरी: लॉस एंजेलिसमध्ये २०१५ मध्ये पार पडलेल्या विश्व अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक पटकावत नरसिंगने ऑलिम्पिकसाठी प्रवेशिका मिळवली.

सर्वोत्तम कामगिरी: आशियाई स्पर्धेत २०१४ आणि २०१५ साली कांस्य पदकाची कमाई, तसेच २०१५ मध्ये विश्व अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक.

नरसिंग यादवने ऑलिम्पिकसाठीचा प्रवास खडतर असा होता. विश्व अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक पटकावत नरसिंगने ऑलिम्पिकसाठी प्रवेशिका मिळवली. ऑलिम्पिकमध्ये भारताकडून कुस्ती या क्रीडा प्रकारात ७४ वजनी गटामध्ये कोणता खेळाडू जाणार, याबाबत वाद-विवादानंतर भारताला कुस्तीमध्ये दोन ऑलिम्पिक पदके मिळवून देणाऱ्या सुशील कुमारला डावलून नरसिंगला प्रवेशिका देण्यात आली. नरसिंग हा मुळचे उत्तरप्रदेशचे असणाऱ्या मुंबईतील एका गिरणी कामगाराचा मोठा मुलगा आहे. २०१० मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेतील कास्यपदकाची कमाई ही नरसिंग यादवचे आतापर्यंतचे सर्वात मोठे यश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2016 2:49 pm

Web Title: narsingh pancham yadav
Next Stories
1 योगेश्वर दत्त
2 गोळाफेकपटू इंदरजित सिंगचा रिओ ऑलिम्पिकचा मार्ग मोकळा?
3 भारतीय कनिष्ठ हॉकी संघाचा विजय
Just Now!
X