21 February 2019

News Flash

नेयमारची स्वप्नपूर्ती

पहिल्या ऑलिम्पिक सुवर्णपदकाला गवसणी

पहिल्या ऑलिम्पिक सुवर्णपदकाला गवसणी

ब्राझील आणि नेयमार यांची ऑलिम्पिक स्पध्रेत फुटबॉलच्या सुवर्णपदकाची प्रदीर्घ काळाची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली. रविवारी मध्यरात्री झालेल्या लढतीत पेनल्टी शूटआऊटमध्ये ब्राझीलने जर्मनीचा ५-४ (१-१) असा पराभव करून सुवर्णपदक पटकावले. लंडनमध्ये ब्राझीलला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते.

मराकाना स्टेडियमवर झालेल्या लढतीत अखेरच्या स्पॉट-किकवर नेयमारने अचूक गोल करून ब्राझीलच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. तत्पूर्वी, जर्मनीच्या निल्स पिटरसनचा प्रयत्न ब्राझीलचा गोलरक्षक वेव्हेर्टन याने अडवला होता. त्यामुळे नेयमारचा गोल निर्णायक ठरला. या विजयानंतर नेयमार मैदानावर गुडघ्यावर बसून आकाशाकडे पाहत स्वप्नपूर्तीच्या आंनदात ढसाढसा रडू लागला.

निर्धारित ९० मिनिटांत नेयमारने २६व्या मिनिटाला ब्राझीलला आघाडी मिळवून दिली, परंतु जर्मनीच्या मेयर मॅक्सीमिलियनने ५९व्या मिनिटाला गोल करून सामना १-१ असा बरोबरीत आणला. या विजयाबरोबर ब्राझीलने दोन वर्षांपूर्वी विश्वचषक स्पध्रेच्या उपांत्य फेरीत झालेल्या मानहानिकारक पराभवाचा वचपा काढला.

कांस्यपदकाच्या लढतीत नायजेरियाने उमर सादिकीच्या दोन गोलच्या जोरावर होंडुरासचा ३-२ असा पराभव केला. अमिनू उमरने नायजेरियासाठी एक गोल केला.  होंडुरासकडून अँटोनी लोझानो व मार्सेलो पेरेरा यांनी  गोल केले.

 

Untitled-21

First Published on August 22, 2016 2:34 am

Web Title: neymar the shootout hero blasts brazil to olympic football gold against germany