News Flash

साक्षीने भेटण्याची वेळ मागितल्यानंतर सेहवागने दिले मजेशीर उत्तर

साक्षीने ट्विटरवर टीम इंडियाचा माजी कसोटीपटू वीरेंद्र सेहवागला भेटण्यासाठी वेळ मागितला.

sakshi malik, virendra sehwag
गुरूवारी सकाळी साक्षीने ट्विटरवर टीम इंडियाचा माजी कसोटीपटू वीरेंद्र सेहवागला भेटण्यासाठी वेळ मागितला.

रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्य पदक मिळवून देणारी महिला कुस्तीपटू साक्षी मलिक बुधवारी भारतात आली. हरियाणात तिचे जंगी स्वागत करण्यात आले. तिला बेटी बचाओ, बेटी पढाओ या अभियानाची सदिच्छा दूत बनवण्यात आल्यामुळे तिच्या आनंदाला पारावर उरला नाही. गुरूवारी सकाळी साक्षीने ट्विटरवर टीम इंडियाचा माजी कसोटीपटू वीरेंद्र सेहवागला भेटण्यासाठी वेळ मागितला. ”मी तुला वेळ देईन पण तु माझ्याशी कुस्ती लढणार नाही, अशी अपेक्षा करतो,” असे मजेशीर उत्तर सेहवागने साक्षीला ट्विटरवरूनच दिले.
साक्षी मलिकने गुरूवारी सकाळी सेहवागला ट्विटरवर विचारले, गुड मॉर्निंग सर, मला तुम्हाला भेटायचे आहे, कृपया तुमच्या सोयीनुसार मला वेळ द्या. काही वेळाने सेहवागने तिला उत्तर दिले. तो म्हणाला, मी तुला वेळ सांगतो, पण साक्षी तु माझ्याशी कुस्ती लढणार नाही, अशी अपेक्षा करतो.
दरम्यान, बुधवारी भारताने ऑलिम्पिकमध्ये दोन पदके मिळवल्यावरून एका ब्रिटिश पत्रकाराने खिल्ली उडवली होती. या पत्रकाराला सेहवागने चोख प्रत्युत्तर दिले होते. ब्रिटिश पत्रकार पियर्स मॉर्गनने भारताने दोन पदके मिळवल्यानंतर केलेल्या जल्लोषावर ट्विट करताना म्हटले होते, १. २ अब्ज लोकसंख्या असलेल्या देशाने केवळ दोन पदके आणली आहेत. किती लाजिरवाणी गोष्ट आहे ही !, हे ट्विट सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. सेहवागने त्याला प्रत्युत्तर देताना म्हटले, आम्हाला छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद साजरा करायला आवडतो. पण ज्या इंग्लंडने क्रिकेटचा ‘शोध लावला त्यांना तर अजूनही विश्वचषक जिंकता आलेला नाही. ते अजूनही विश्वचषक खेळतात. लाजीरवाणे आहे हे!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2016 7:43 pm

Web Title: olympic woman wrestling medal winner sakshi malik asked to meet to cricketer virendra sehwag got amusing reply from him
Next Stories
1 ऑलिम्पिक ध्वजाच्या आगमनानंतर टोकिओत उत्साहाचे वातावरण
2 शिक्षेच्या भीतीने लिलेसाची मायदेशाकडे पाठ
3 लिव्हरपूलचा दणदणीत विजय
Just Now!
X