रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटनच्या महिला एकेरी गटात भारताच्या पी.व्ही.सिंधूला अंतिम सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. सिंधूने रौप्य पदकाची कमाई केली. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेची दोन पदके नावावर असणाऱया सिंधूने अंतिम फेरीत स्पेनच्या कॅरोलिना मरिनला चांगली झुंज दिली. कॅरोलिना मारिन या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या बॅडमिंटनपटूचे खडतर आव्हान पी.व्ही.सिंधूने उत्तमरित्या पेलले होते. दोघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. सामना तिसऱया सेटपर्यंत गेला. पहिल्या गेममध्ये सिंधूने २१-१९ अशी दमदार कामगिरी केली, तर दुसऱया गेममध्ये पुनरागमन करत कॅरोलिनाने १२-२१ असा जिंकला. त्यामुळे सामना तिसऱया आणि निर्णायक गेमपर्यंत पोहोचला. तिसऱया गेममध्ये कॅरोलिनाने आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करत २१-१५ असा जिंकला आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली.
सिंधूने स्पर्धेत जागतिक क्रमवारीत दुसऱया स्थानी असलेल्या वांग यिहानसारख्या मातब्बर खेळाडूला नमवल्यानंतर तिचा आत्मविश्वास उंचावल्याचे उपांत्य फेरीत स्पष्ट दिसून आले. उपांत्य फेरीत सिंधू मोठ्या आत्मविश्वासाने खेळली आणि जपानच्या नोझोमी ओकुहारावर मात करून अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला होता. सिंधूने जपानच्या नोझोमी ओकुहारावर २१-१९, २१-१० असा विजय मिळवला होता. प्रदीर्घ रॅली, घोटीव ड्रॉपचे फटके आणि खणखणीत परतीच्या फटक्यांच्या बळावर सिंधूने उपांत्य फेरीत दणदणीत वर्चस्व गाजवले.

PV Sindhu vs Carolina Marin Live:

# सिंधूकडून लागोपाठ दोन गुणांची कमाई, भारत १४-१६ स्पेन

# कॅरोलिनाकडून घोटीप ड्रॉपचे फटके, भारत १२-१५ स्पेन

# कॅरोलिनाकडे पुन्हा एकदा चार गुणांची आघाडी, सिंधू १०-१४

# सिंधू तिसऱया गेममध्ये फक्त एका गुणाने पिछाडीवर, सिंधू १०-११ कॅरोलिना

# दोन्ही खेळाडूंची गुणांची बरोबरी, सिंधू १०-१० कॅरोलिना

# सिंधूकडून अप्रतिम बॉडी लाईन स्पॅश, सिंधू ९-१० कॅरोलिना

# सिंधू केवळ दोन गुणांनी पिछाडीवर, सिंधू ८-१० कॅरोलिना

# सिंधूकडून लागोपाठ दोन गुणांची कमाई, भारत ७-९ स्पेन

# सिंधूने गुण कमावला, भारत ५-९ स्पेन

# पी.व्ही.सिंधूच्या अप्रतिम स्मॅश, तरीही कॅरोलिनाकडे अद्याप चार गुणांची आघाडी

# पी.व्ही.सिंधूने उत्तम स्मॅशच्या जोरावर गुण कमावत गुणांतील फरक कमी केला. भारत ३-६ स्पेन

# कॅरोलिनाकडे तीन गुणांची आघाडी, भारत १-४ स्पेन

# कॅरोलिनाची तिसऱया गुणाची कमाई

# पी.व्ही.सिंधूने तिसऱया गेममध्ये खाते उघडले. भारत १-२ स्पेन

# दुसरा गुण देखील कॅरोलिनाच्या खात्यात

# तिसऱया आणि निर्णायक गेमला सुरूवात, पहिला गुण कॅरोलिनाने जिंकला

# सिंधूने दुसरा गेम १२-२१ असा गमावला, सामन्याचा निकाल तिसऱया गेमवर अवलंबून

# सिंधूकडून पुन्हा एकदा दोन गुणांची कमाई, पण अजूनही कॅरोलिनाकडे ७ गुणांची आघाडी

# पी.व्ही.सिंधूने दमदार स्मॅश मारला, भारत ९-१६ स्पेन

# पी.व्ही.सिंधूने आणखी एक गुण कमावला, भारत ८-१५ स्पेन

# पी.व्ही.सिंधूने शानदार गुणाची कमाई, भारत ७-१४ स्पेन

# पी.व्ही.सिंधूने आणखी एक गुण कमावला, भारत ६-१४ स्पेन

# पी.व्ही.सिंधू ५-१२ कॅरोलिना मारिन

# सिंधूकडून आणखी एका गुणाची कमाई, भारत ४-११ कॅरोलिना

# दुसऱया गेममध्ये सिंधू ३-११ कॅरोलिना

# दुसऱया गेममध्ये पी.व्ही.सिंधूची खराब कामगिरी, भारत ७ गुणांची पिछाडीवर

# कॅरोलिनाचा उत्कृष्ट स्मॅश, स्पेन पाच गुणांनी आघाडीवर

# दुसऱया गेममध्ये सिंधूचे खाते उघडले, भारत १-४ स्पेन

# तिसरा गुण देखील कॅरोलिनाने कमावला.

# दुसऱया गेममध्ये कॅरोलिनाची चांगली सुरूवात, पहिले दोन गुण स्पेनच्या खात्यात

# पी.व्ही.सिंधूचे दोन शानदार स्मॅश आणि पहिला गेम २१-१९ असा जिंकला.

# पी.व्ही.सिंधूचे दमदार कमबॅक, दोन्ही खेळाडूंचे गुण १९-१९ असे बरोबरीत

# पी.व्ही.सिंधूकडून आणखी एका गुणाची कमाई, भारत १८-१९ स्पेन

# पी.व्ही.सिंधू १७-१९ कॅरोलिना मारिन

# सिंधू आणि कॅरोलिनामध्ये गुणांची कडवी झुंज, भारत १६-१७ स्पेन

# सिंधूकडून तीन गुणांची कमाई, सिंधू १६-१७ कॅरोलिना

# पी.व्ही.सिंधू केवळ दोन गुणांनी पिछाडीव, भारत १३-१५ स्पेन

# सिंधूकडून एका गुणाची कमाई, भारत १०-१३ स्पेन

# पुन्हा एकदा सिंधूने कोर्टच्या बाहेर शटल शॉट, कॅरोलिना १३-९ सिंधू

# पी.व्ही.सिंधूकडून सलग दोन गुणांची कमाई, कॅरोलिना १२-९ सिंधू

# कॅरोलिना १२-७ पी.व्ही.सिंधू

# कॅरोलिनाकडून उत्तम खेळी, भारत चार गुणांनी पिछाडीवर

# सिंधूचा दमदार स्मॅश, भारत ४-६ स्पेन

# पी.व्ही.सिंधू चार गुणांनी पिछाडीवर, भारत ७-३ स्पेन

# कॅरोलिना मरिनचा शानदार स्मॅश, सिंधू पिछाडीवर

# दुसरा गुण पी.व्ही.सिंधूने पटकावला

# सामन्याला सुरूवात, पहिला गुण मारिनच्या खात्यात

# पी.व्ही.सिंधू आणि कॅरोलिना मारिन बॅडमिंटन कोर्टवर दाखल

# सध्या पुरूषांच्या वैयक्तिक गटातील दुसऱया उपांत्यपूर्व फेरीची लढत सुरू आहे, हा सामना संपल्यानंतर पी.व्ही.सिंधू आणि कॅरोलिना मारिनच्या अंतिम सामन्याला सुरूवात होणार.

# पी.व्ही.सिंधूने उपांत्य फेरीत पराभव केलेल्या जपानच्या नोझोमी ओकुहाराला कांस्य पदक. प्रतिस्पर्धी खेळाडूच्या हाताला दुखापत झाल्याने नोझोमीला विजयी घोषित करण्यात आले.

# वाचा: सुवर्ण पदकासाठी सिंधू समोर असतील ही पाच आव्हाने

# सोशल मीडियावर पी.व्ही.सिंधूवर शुभेच्छांचा वर्षाव-

# पी.व्ही.सिंधू आणि कॅरोलिना मारिन यांच्यात आजवर सात सामने झाले असून, चार सामने कॅरोलिनाने जिंकले आहेत.