20 February 2019

News Flash

Rio 2016 : सलमान खान ऑलिम्पिकमधील प्रत्येक भारतीय खेळाडूला एक लाख रूपये देणार

सलमान खान याने नुकत्याच येऊन गेलेल्या 'सुल्तान' या चित्रपटात एका कुस्तीपटूची भूमिका साकारली होती.

Salman Khan : सलमान खान याने नुकत्याच येऊन गेलेल्या सुल्तान या चित्रपटात एका कुस्तीपटूची भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वीही ठरला होता.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याने ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक भारतीय खेळाडूला एक लाख एक हजार रूपये देणार असल्याची घोषणा केली आहे. सलमान खानने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून याबद्दलची माहिती दिली. भारतीय खेळाडूंप्रती असलेली कृतज्ञतेची भावना म्हणून आपण ही रक्कम देत असल्याचे सलमानने सांगितले. सलमान खान याने नुकत्याच येऊन गेलेल्या ‘सुल्तान’ या चित्रपटात एका कुस्तीपटूची भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वीही ठरला होता.

सलमान खान याची रिओ ऑलिम्पिकसाठी  भारतीय पथकाच्या सदिच्छादूतपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, यावरून बराच वादंग निर्माण झाला होता. सलमानवर न्यायालयात असलेले खटले आणि मुळात तो क्रिडापटू नाही हे त्यामागचे कारण होते. मात्र, याबद्दल स्पष्टीकरण देताना सलमानने अनेक राजकारण्यांवरही खटले सुरू असल्याचे निदर्शनास आणून देत जर राजकारण्यांनी त्यांचे पद सोडले तर मीदेखील माझे सदिच्छादूत पद सोडायला तयार असल्याचे सांगितले होते.

Rio 2016 : सलमान जेव्हा ‘दीपिका, दिप्ती की दीपा’ यामध्ये गोंधळून जातो!

First Published on August 18, 2016 8:17 am

Web Title: rio 2016 salman khan to present cheque of 1 lakh each indian olympic athlete