रिओ ऑलिम्पिकमध्ये पी. व्ही. सिंधू आणि साक्षी मलिकनंतर भारतीय  गोल्फपटू अदिती अशोकने अंतिम फेरीत प्रवेश करुन पदकाच्या आशा पल्लवीत केली होती. मात्र, पहिल्या दोन फेरीमध्ये चांगली कामगिरी बजावणाऱ्या अदितीने शनिवारी अंतिम फेरीत खेळताना निराशजनक सुरुवात केली. आज तिसऱ्या फेरीमध्ये  ७९ गुण मिळविल्यानंतर तिला ३१ व्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यामुळे भारताच्या गोल्फमधील पदकाच्या आशा जवळ जवळ संपुष्टात आले आहे. गोल्फ स्पर्धेमध्ये कोरियाची पार्क एनबी कुल २०२ गुणासह अव्वल स्थानी आहे. तर जागतिक क्रमवारीतील अव्वल असणारी न्युझीलंडची  गोल्फपटू लीडीया अमेरिकन  गेरिना पिलरसोबत संयुक्तरित्या दुसऱ्या स्तानावर आहे. गोल्फपटू अदिती अशोकने प्रभावी कामगिरीसह अंतिम फेरी गाठली होती. बंगळुरूच्या १८वर्षीय अदितीने २०१३ आशियाई युवा अजिंक्यपद, २०१४ युवा ऑलिम्पिक आणि २०१४ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्त्व केले आहे. ऑलिम्पिक गोल्फ स्पर्धेत ६० खेळाडूंचा सहभाग असतो. अदितीने १८ होलवर सातत्यपूर्ण कामगिरी केली होती.