News Flash

Video : ‘रिओ ऑलिम्पिक’मध्ये ६० फूटांवरून कॅमेरा खाली पडून सात जखमी

केबल खेचली गेल्याने कॅमेरा खाली कोसळला.

(Photo: Youtube)

रिओ ऑलिम्पिकदरम्यान एक टिव्ही कॅमेरा अचानक उंचावरून खाली कोसळल्याने अनेकजण जखमी झाले. हवेतून शूट करणारा हा कॅमेरा ऑलिम्पिक पार्कबाहेर जवळजवळ ६० फूट उंचावरून खाली पडला. सोमवारी घडलेल्या या घटनेत सात जण जखमी झाल्याची माहिती मिळते. लांबचे शॉट घेण्यासाठी या ‘स्पायडर’ कॅमेऱ्याचा वापर केला जात होता. केबल खेचली गेल्याने कॅमेरा खाली कोसळला. जखमींवर तातडीने औषधोपचार करण्यात आल्याने त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे ‘ऑलिम्पिक ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस’कडून सांगिण्यात आले. या घटनेचा व्हिडिओदेखील समोर आला असून, हा वजनदार कॅमेरा जमिनीवर कोसळताना या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतो. व्हिडिओमध्ये मैदानावर दोन स्त्रियादेखील दिसत असून, एकीच्या नाकातून तर अन्य महिलेच्या खांद्यातून रक्तप्रवाह होताना दिसते. अन्य एका व्हिडिओत एका मुलीला स्ट्रेचरवरून अॅम्ब्युलन्समध्ये घेऊन जात असल्याचे पाहायला मिळते. कॅमेराचे वजन जास्त असल्याची ‘ऑलिम्पिक ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस’ला कल्पना असल्याने त्यांनी कॅमेरा खाली पडण्याआधीच तेथून लोकांना बाजूला करण्यास सुरुवात केली होती. तारांमुळे काही काळासाठी कॅमेऱ्याला खाली पडण्यापासून वाचवता येईल असे त्यांना वाटले. परंतु, कॅमेरा खाली पडला आणि सात जण जखमी झाले. कोणालाही गंभीर इजा झाली नसल्याचे आयोजन समितीच्या प्रवक्त्याने सांगितले. दरम्यान ‘रिओ ऑलिम्पिक’मध्ये ६ ऑगस्टला सायकलिंग स्टेडिअमच्याबाहेर स्फोटाचा आवाज झाला होता. बॉम्बविरोधी दल घटनास्थळी तात्काळ पोहचले होते. चांगली गोष्ट म्हणजे यावेळी कोणीही जखमी झाले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2016 2:15 pm

Web Title: rio olympics seven injured after tv camera fell on ground
Next Stories
1 Rio 2016 : दीपा कर्माकर आणि ललिता बाबरच्या नावाने विमान आणि ट्रेन सुरू करा- सेहवाग
2 Rio 2016 : क्रीडा क्षेत्रात पुरेशी गुंतवणूक केल्याशिवाय पदकाची अपेक्षा करू नका- अभिनव बिंद्रा
3 Rio 2016: पी. व्ही. सिंधूचा उपांत्य फेरीत प्रवेश
Just Now!
X