News Flash

सायना नेहवाल

अथक मेहनतीच्या बळावर सायनाने लंडन ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडवला होता.

Saina Nehwal won a place for herself in Rio 2016 Olympics. (Source: Express Photo)

वय: २६

स्पर्धा : बॅडमिंटन (महिला एकेरी)

स्पर्धेची तारीख: ११ ऑगस्ट

पात्रता फेरी: ‘बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन’ने जागतिक क्रमावारी मे महिन्यात जाहीर केल्यानंतर सायना नेहवालची रिओ ऑलिम्पिकवारी निश्चि झाली.

विक्रम: ऑलिम्पिक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारणारी पहिली भारतीय महिला खेळाडू. २०१२ सालच्या लंडन ऑलिम्पिकमध्ये सायनाने कांस्य पदकाची कमाई केली होती.

पुरस्कार: सायना नेहवाल बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारी अव्वल स्थानावर आहे. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने तिला सर्वोत्तम बॅडमिंटनपटूच्या पुरस्काराने सन्मानित केले आहे. याशिवाय, अर्जुन पुरस्काराचीही ती मानकरी ठरली आहे. २०१० साली सायनाचा पद्मश्री पुरस्काराने, तर २००९ साली राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. यंदा तिला पद्म भूषण पुरस्कार देखील बहाल करण्यात आला.

सायना नेहवाल ही मूळची हिस्सारची असून, जागतिक स्तरावर बॅडमिंटन खेळात अव्वल स्थानावर असलेली भारतीय खेळाडू म्हणून तिची ओळख आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरलेल्या एकूण सात भारतीय खेळाडूंमध्ये जणांमध्ये सायनाचाही समावेश आहे. आई-वडिलांचा भक्कम पाठिंबा, पुल्लेला गोपीचंद यांच्या रूपात लाभलेला खंबीर मार्गदर्शक आणि अथक मेहनत यांच्या बळावर सायनाने लंडन ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडवला. चीनच्या खेळाडूंची मक्तेदारी मोडून काढत सायनाने स्वत:च्या नावाची छाप उमटवली आहे. देशातल्या बॅडमिंटन चळवळीला गतिमानता देण्यात प्रेरक ठरलेल्या सायनाच्या नावावर आंतरराष्ट्रीय स्पर्धाची तब्बल २२ जेतेपदे आहेत. सायना नेहवाल हा ब्रॅण्ड प्रस्थापित करताना खेळातली एकाग्रता तिने ढळू दिली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2016 9:23 pm

Web Title: saina nehwal womens singles badminton
Next Stories
1 रोहन बोपण्णा
2 ललिता बाबर
3 टिंटू लूका
Just Now!
X