वय: २५

खेळ प्रकार- कुस्ती (५७ किलो किलो फ्री स्टाईल)

सामन्याची तारीख: १८ ते २१ ऑगस्ट

पात्रता फेरी: मंगोलियातील ऑलिम्पिक पात्रता लढतीत विजयी

सर्वोत्तम कामगिरी : २०१६ मधील आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक, २०१३ साली कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्ण, २०१४ मध्ये डेव्ह शुल्टझ स्मृती आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक, २०१४ मध्ये जागतिक लष्करी कुस्ती स्पर्धेत सुवर्ण

संदीप तोमरने आपल्या खेळीतील सातत्याने क्रमवारीतील आपले स्थान स्थिर ठेवले आहे. ५५ किलो वजनी गटातून खेळाला सुरुवात करणाऱ्या संदीपने प्रशिक्षकांच्या सल्ल्याने ५७ किलो वजनी गटात खेळण्यास सुरुवात केली. २०११ मध्ये राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक मिळविल्यानंतर संदीप तोमर भारतीय नौदलात कनिष्ठ अधिकारी पदावर रुजू झाला. संदीप तोमरच्या उत्तर प्रदेशमधील भागपट जिल्ह्यातील मालकपूरमधील तीन कुस्तीपटूंनी ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. मात्र तिन्ही मल्लांना देशाला पदक मिळवून देता आलेल नाही. संदीप तोमर ही उणीव दुर करेल, अशी अशा आहे.