News Flash

सानिया मिर्झा

सानियाचे यंदाचे ऑलिम्पिकवारीचे तिसरे वर्षे आहे.

Sania Mirza will play in Rio 2016 Olympics in women’s doubles and mixed doubles category. (Source: Express Photo)

वय- २९

स्पर्धा: टेनिस महिला दुहेरी (प्रार्थना ठोंबरेसह), मिश्र दुहेरी (रोहन बोपण्णासह)

स्पर्धेची तारीख: टेनिस महिला दुहेरी स्पर्धा ६ किंवा ७ ऑगस्ट रोजी सुरू होईल, तर मिश्र दुहेरी स्पर्धा १० ऑगस्टपासून सुरू होणार आहे.

पात्रता फेरी: सहा जून रोजी जाहीर झालेल्या जागतिक क्रमवारीत सानिया मिर्झा महिला दुहेरीच्या क्रमवारी अव्वल स्थानी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ती रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली.

सर्वोत्तम कामगिरी: सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस जोडीने गेली दोन वर्षे महिला टेनिस दुहेरीमध्ये आपला दबदबा कायम ठेवला. गतवर्षी सानिया-हिंगिस जोडीने विम्बल्डन, अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा आणि ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा या मानाच्या स्पर्धांचे विजेतेपद जिंकले.

विक्रम: सानियाचे भारतीय महिला टेनिसला नवे स्थान गाठून देण्यात महत्त्वाचे योगदान राहिले आहे. आपल्यावर होणाऱया वादविवादांवर मात करून सानियाने कामगिरीत सातत्य राखले आहे. नुकतेच तिने सलग दोनदा(२०१४, २०१५ ) डब्ल्यूटीए स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले होते.

सानियाचे यंदाचे ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागाचे तिसरे वर्षे आहे. सानिया यंदा युवा टेनिसपटू प्रार्थना ठोंबरेच्या साथीने महिला दुहेरी स्पर्धा खेळताना दिसेल. २००८ सालच्या ऑलिम्पिकमध्ये सानिया महिला दुहेरी गटात सुनिथा राव हिच्यासोबत खेळली होती. सानिया-सुनिथा यांचा स्पर्धेच्या दुसऱयाच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. लंडन ऑलिम्पिकमध्येही सानियाच्या पदरात पहिल्याच फेरीत निराशा पडली. मात्र, मिश्र दुहेरीमध्ये सानियाने लिएण्डर पेसच्या साथीने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. यंदा सानिया मिश्र दुहेरीमध्ये टेनिसपूट रोहन बोपण्मासोबत खेळताना दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2016 10:13 pm

Web Title: sania mirza womens doubles and mixed doubles tennis
Next Stories
1 सायना नेहवाल
2 रोहन बोपण्णा
3 ललिता बाबर
Just Now!
X