23 February 2019

News Flash

Rio2016: उसेन बोल्टच वेगाचा बादशहा; ४ बाय १०० मीटरमध्ये पटकावले सुवर्णपदक

सलग तीन ऑलिम्पिकमध्ये तीन सुवर्णपदकं जिंकणारा उसेल बोल्ट पहिलाच खेऴाडू

जमैकाचा धावपटू उसेन बोल्ट याने रिओ ऑलिम्पिकमधील ४ बाय १०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक मिळवले आहे. या सुवर्णपदकासह बोल्टने ऑलिम्पिक सुवर्णपदकांची हॅटट्रिक साधली आहे. बोल्टने ही शर्यत ३७.२७ सेकंदात पूर्ण केली. यापूर्वी, बोल्टने १०० मीटर आणि २०० मीटर शर्यतीत सुवर्णपदकाची हॅट्रीक केली होती. त्यानंतर आता त्याने ब्राझीलला ४ बाय १०० मीटरमध्ये सुवर्णपदक पटकावून दिले आहे. सलग तीन ऑलिम्पिकमध्ये तीन सुवर्णपदकं जिंकणारा उसेल बोल्ट पहिलाच खेऴाडू, तर नऊ सुवर्णपदकं जिंकणारा चौथा खेळाडू ठरला आहे. वेगाचा बादशहा म्हणून उसेन ओळखला जातो. उसेनची मैदानात शर्यत ही आपल्या प्रतिस्पर्ध्यांशी नसून ती केवळ आणि केवळ वेगाशी आणि घड्याळ्यात फिरणा-या काट्यांशी असते असे म्हणतात. उसनने ४ बाय १०० मीटर शर्यतीत सुवर्ण पदक जिंकत आपणच महान खेडाळू असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. ही स्पर्धा जपानने ३७.६० सेकंदात पूर्ण करत रौप्य पदक तर अमेरिकेने ३७.६० सेकंदात पूर्ण करत कांस्य पदक पटकाविले आहे. आपल्या कारकिर्दीतील नववे सुवर्णपदक जिंकत बोल्ट आता डिस्टन्स रनिंगमध्ये २० व्या शतकात वर्चस्व गाजवणारे दिवंगत धावपटू पावो नुरमी आणि अमेरिकेचा माजी धावपटू व लांब उडी मारणारा कार्ल लुईस यांच्या पंक्तीत आला आहे.

क्रीडा क्षेत्रातील महान खेळाडूंच्या पंक्तीत मला स्थान द्या!
ऑलिम्पिकमधील २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सलग तिसऱ्यांदा सुवर्णपदकाची कमाई करून इतिहास घडवणाऱ्या उसैन बोल्टने आपल्याला क्रीडा क्षेत्रातील सार्वकालिक महान खेळाडूंच्या पंक्तीत मला स्थान द्यावे, अशी विनंती केली आहे. पेले, मोहम्मद अली आणि मायकेल फेल्प्स यांच्यासारख्या क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांमध्ये माझे नाव घेतले जावे, अशी इच्छा बोल्टने प्रदर्शित केली.
‘‘एक सर्वोच्च खेळाडू व्हावे, याच उद्देशाने मी खेळाकडे पाहिले. अली आणि पेले यांच्याप्रमाणेच आपले नावे व्हावे, असे मला वाटायचे. तुम्ही मंडळी माझ्याबाबत काय लिहाल, याचीच मला उत्सुकता आहे,’’ असे बोल्टने सांगितले. बोल्टने आपल्या कारकीर्दीत एकंदर १९ ऑलिम्पिक आणि जगज्जेतेपदांची कमाई केली आहे. त्यामुळेच २०० मीटर ही त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील अखेरची वैयक्तिक शर्यत ठरली.
मी जगात महान असल्याचे सिद्ध केले आहे. नेमके यासाठी मी रिओत आलो होतो. याचकरिता माझे अखेरचे ऑलिम्पिक असल्याचे मी म्हणालो होतो. मला आणखी काही सिद्ध करायची मुळीच आवश्यकता नाही.– उसेन बोल्ट

First Published on August 20, 2016 8:08 am

Web Title: usain bolt completes treble as jamaica win gold in mens 4x100m relay