वेगाचा राजा म्हणून ओळख असलेला जागतिक विक्रमवीर धावपटू उसेन बोल्ट रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी सज्ज झाला असून, यंदाच्या स्पर्धेत नवा विक्रम करण्याचा मानस असल्याचे त्याने म्हटले आहे. त्यादृष्टीने बोल्टचा सराव देखील सुरू आहे. नुकतेच बोल्टने आपल्या सराव सत्रातून वेळ काढून ब्राझीलच्या लष्करी पथकासोबत फोटो शूट केले. उसेन बोल्टने सैनिकांसोबतचे छायाचित्र आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. बोल्ट यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक विजयाची हॅट्ट्रीक साजरी करण्यासाठी सज्ज आहे. बोल्ट १०० मी, २०० मी आणि ४x१०० मी रिले प्रकारात धावताना दिसणार आहे.
२९ वर्षीय उसेन बोल्ट १३ ऑगस्ट रोजी १०० मीटर स्पर्धेत धावताना दिसेल. १०० आणि २०० मी धावण्याच्या स्पर्धेतील जागतिक विक्रम नावावर असणारा उसेन बोल्ट हा जगातील पहिलाच धावपटू आहे. याशिवाय, ४x१०० मी. रिले प्रकाराचा जागतिक विक्रम देखील बोल्टच्या नावावर आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 4, 2016 3:29 pm