20 February 2019

News Flash

Rio 2016: साक्षी मलिक के गले मे मेडल कितना ‘शोभा दे’ रहा है- वीरेंद्र सेहवाग

वीरेंद्र सेहवागच्या ट्विटचे बॉलीवूड सेलिब्रिटींकडून कौतुक केले जात आहे.

रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱया लेखिका शोभा डे यांना भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने जशास तसे उत्तर दिले आहे

रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱया लेखिका शोभा डे यांना भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने जशास तसे उत्तर दिले. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेचे दहा दिवस उलटूनही भारताच्या खात्यात एकही पदक न आल्याने शोभा डे यांनी भारतीय खेळाडू रिओमध्ये केवळ सेल्फी काढायला गेल्याचे ट्विट करून वाद ओढावून घेतला होता.

वाचा : ऑलिम्पिकमध्ये जाऊन खेळणे सोपे नाही- सचिन तेंडूलकर

भारताची महिला कुस्तीपटू साक्षी मलिक हिने गुरूवारी उल्लेखनीय कामगिरी करत कांस्य पदकाची कमाई केली आणि भारताचे खाते उघडले. मग वीरूने क्षणाचाही विलंब न करता शोभा डे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. साक्षी मलिक के गले मैं मेडल कितना ‘शोभा दे’ रहा है, असे ट्विट करत वीरेंद्र सेहवागने ट्विटरवर दमदार बॅटिंग केली. वीरेंद्र सेहवागच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हे ट्विट करण्यात आलेले नसले तरी वीरेंद्र सेहवागने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून संबंधित ट्विट रिट्विट केले आहे. त्यासोबतच शोभा डे यांनी असे कृत्य करण्याची काहीच गरज नव्हती, असे वीरूने म्हटले आहे.
वीरेंद्र सेहवागच्या ट्विटचे बॉलीवूड सेलिब्रिटींकडून कौतुक केले जात आहे. वीरूने तर एका ट्विटने थेट स्टेडियमच्या बाहेर षटकार मारला, असे ट्विट करत बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी वीरेंद्र सेहवागच्या हजरजबाबीपणाचे कौतुक केले.

काय म्हणाल्या होत्या शोभा डे?-
रिओला जाऊन सेल्फी काढायचे आणि खाली हातांनी परतायचे, हेच भारतीय खेळाडूंचे रिओ ऑलिम्पिकमधील लक्ष्य असल्याचे शोभा डे यांनी ट्विटरवर म्हटले होते. भारतीय खेळाडू पैसा आणि संधी दोन्हीचा अपव्यय करत असल्याचे डे म्हणाल्या होत्या.

First Published on August 18, 2016 3:22 pm

Web Title: virender sehwag rubs salt on shobhaa des wounds after sakshi malik wins bronze