News Flash

योगेश्वर दत्त

योगेश्वर दत्तने २०१२ मध्ये लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला कांस्य पदक मिळवून दिले होते

हरियाणा जिल्ह्यातील सोनपत जिल्ह्यातील योगेंद्र दत्तची चौथ्यांदा ऑलिम्पिकसाठी निवड झाली आहे

वय: ३३

खेळ प्रकार- कुस्ती (६५ किलो फ्री स्टाईल, पुरुष)

सामन्याची तारीख: २१ ऑगस्ट

पात्रता फेरी : फेब्रुवारी २०१६ कजाकिस्तानमधील आस्ताना येथे झालेल्या पात्रता फेरीत प्रवेश निश्चित केला.

विक्रम : कुस्तीमध्ये भारताला पदक मिळवून देणारा तिसरा कुस्तीपटू.

सर्वोत्तम कामगिरी : आशियन क्रिडा २०१४ सुवर्ण पदक तसेच २०१४ मधील राष्टकुल स्पर्धेत सुवर्ण पदक

योगेश्वर दत्तने २०१२ मध्ये लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला कांस्य पदक मिळवून दिले होते. त्याने ६० किलो वजनी गटात पदकाला गवसणी घातली. त्यामुळे योगेश्वर दत्तकडून यंदाच्या रियो ऑलिम्पिकमध्ये भारताला आशा आहेत. हरियाणा जिल्ह्यातील सोनपत जिल्ह्यातील योगेंद्र दत्तची चौथ्यांदा ऑलिम्पिकसाठी निवड झाली आहे. लंडन ऑलिम्पिकनंतर मागील पाच वर्षांपासून दत्त दुखापतीने त्रस्त होता. मागील तीन वर्षात त्याच्या दोन्ही गुडघ्यावर शस्रक्रिया करण्यात आल्या आहेत. यंदाची ऑलिम्पिक स्पर्धा त्याच्या कारकिर्दीतील शेवटची असेल, अशी घोषणा योगेंद्र दत्तने स्पर्धेत निवड झाल्यानंतर केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2016 2:44 pm

Web Title: yogeshwar dutt
Next Stories
1 गोळाफेकपटू इंदरजित सिंगचा रिओ ऑलिम्पिकचा मार्ग मोकळा?
2 भारतीय कनिष्ठ हॉकी संघाचा विजय
3 तंदुरुस्तीचा महागुरू
Just Now!
X