कुस्तीच्या आखाड्य़ातून रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला  सुवर्ण पदक मिळेल ही आशा संपुष्टात आली आहे. भारतीय मल्ल योगेश्वर दत्तला पहिल्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. मंगोलियाच्या गांझोगियाने योगेश्वरला ३-० असे पराभूत केले. योगेशच्या सुवर्ण पदकाच्या आशा संपुष्टात आल्या असल्या तरी गत ऑलिम्पिकप्रमाणे कास्य पदकाच्या आशा अजून जीवंत आहेत.  रिओ ऑलिम्पिकमधून  योगेश्वर दत्त कास्य पदकाचे रुपांतर सोन्यात करुन मायदेशी परतेल, असा विश्वास योगेश्वरची आई  सुशिला देवी यांनी  योगेश्वरच्या लढतीपूर्वी व्यक्त केला होता.  लंडन ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताला कास्य पदक मिळवून देणाऱ्या योगेश्वर दत्तकडून पदकाची आशा आहे. रिओच्या आखाड्यात रविवारी योगेश्वर दत्त  फ्रि स्टाइल कुस्ती प्रकारात  ६५ किलो वजनी गटात  मैदानात उतरणार आहे. त्याच्या समोर पहिल्या फेरीत मंगोलियाचा गंजोरिगी मंदाख्वाराण याचे आव्हान असेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ५ वाजता कुस्तीची लढत रंगणार आहे.  रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुषांची कामगिरी ही निराशजन झाली असून दिग्गजांच्या अपयशानंतर योगेश्वरकडून पदकाची अपेक्षा आहे. महिला गटात साक्षी मलिकने आखाड्यातून भारताच्या पदकाचे खाते उघडले होते. त्यामुळे आता स्पर्धेच्या शेवटी मैदान मारण्याच्या इराद्यानेच योगेश्वर दत्त मैदानात उतरेल. गत वर्षीच्या तुलनेत यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताची कामगिरी निराशाजनक राहीली आहे. आतापर्यंत भारताला केवळ २ पदके मिळवता आली आहेत. विषेश म्हणजे ही दोनही पदके भारताला महिला खेळाडूंनी मिळवून दिली आहेत. योगेश्वर दत्तने २०१२ मध्ये लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत  ६० किलो वजनी गटात भारताला कास्य पदक मिळवून दिले होते.  त्यामुळे योगेश्वर दत्तकडून यंदाच्या रियो ऑलिम्पिकमध्ये भारताला पदकाची आशा आहे. योगेश्वर दत्तची चौथ्यांदा ऑलिम्पिकसाठी निवड झाली आहे.  यंदाची ऑलिम्पिक स्पर्धा त्याच्या कारकिर्दीतील शेवटची असेल, अशी घोषणा योगेंद्र दत्तने स्पर्धेत निवड झाल्यानंतर केली होती. त्यामुळे कारकीर्दीतील शेवटच्या स्पर्धेत चमकदारी कामगिरी करण्यासाठी तो मैदानात उतरेल.