scorecardresearch

Rishabh Pant Accident: “एवढा पैसा कमवतात मग एक ड्रायव्हर तर …”, ऋषभ पंतच्या कार अपघातावर कपिल देव यांचे मोठे वक्तव्य

ऋषभ पंतच्या कार अपघातावर विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देव यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. आपल्यासोबत घडलेल्या एका घटनेचाही त्यांनी उल्लेख केला.

Rishabh Pant Accident: “एवढा पैसा कमवतात मग एक ड्रायव्हर तर …”, ऋषभ पंतच्या कार अपघातावर कपिल देव यांचे मोठे वक्तव्य
ऋषभ पंतच्या अपघातावर कपिल देव यांचे वक्तव्य (सौजन्य- लोकसत्ता ग्राफिक्स)

भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत ३० डिसेंबरच्या सकाळी कार अपघाताचा बळी ठरला होता. दिल्ली-डेहराडून महामार्गावरील दुभाजकाला धडकल्याने त्यांची कार उलटली. या भीषण अपघातात पंतचा जीव थोडक्यात बचावला. तो स्वतः गाडी चालवत होता आणि गाडीत एकटाच होता. पंतच्या अपघातानंतर चाहत्यांनी, माजी क्रिकेटपटूंनी आणि सध्याच्या क्रिकेटपटूंनी आपापल्या पद्धतीने प्रतिक्रिया व्यक्त केल्या आणि त्याला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्याचवेळी विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देव यांनी पंतच्या अपघातावर भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

ऋषभ पंतच्या अपघातानंतर संपूर्ण क्रिकेट जगताला धक्का बसला आहे. ऋषभ पंतच्या कार अपघातानंतर देश-विदेशातील क्रिकेटपटूंनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सध्याच्या आणि माजी क्रिकेटपटूंनी ऋषभ पंतला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, १९८३ चा विश्वचषक विजेता कपिल देव म्हणाले की, “ऋषभ पंत ड्रायव्हर ठेवू शकतो.” पुढे म्हणाले की, “त्यांना समजते की त्यांच्यासारख्या तरुणांना लग्झरी कारचे वेड आहे आणि त्यांना वेगाची पर्वा नाही.”

हेही वाचा: Rishabh Pant Accident: “चाचू जल्दी ठीक हो जाओ”, रोहित शर्मा च्या लेकीचा ऋषभ पंतला भावनिक संदेश, Video व्हायरल

कपिलने एबीपी न्यूजला सांगितले की, “हा सर्वांसाठी धडा आहे.” मी नवोदित क्रिकेटपटू असताना मोटारसायकलचा अपघात झाला. त्या दिवसापासून माझ्या भावाने मला मोटरसायकलला हातही लावू दिला नाही. ऋषभ पंत सुरक्षित आहे. आलेल्या माहितीनुसार पंतच्या डोक्याला, मनगटावर, पाठीला आणि पायाला दुखापत झाली आहे. त्याला अनेक महिने मैदानापासून दूर राहावे लागू शकते. पंतवर सध्या डेहराडूनमधील मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, ज्यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) बारकाईने देखरेख करत आहे.

कपिल म्हणतात की, “कार स्वतः चालवण्याऐवजी पंतने ड्रायव्हर ठेवायला हवा होता.” ते पुढे म्हणाले, “तुमच्याकडे चांगली दिसणारी कार आहे, जी खूप वेगवान आहे. अशा परिस्थितीत ड्रायव्हिंग करताना सतर्क राहावे लागते. आपण सहजपणे ड्रायव्हर ठेवू शकतो. तेवढा पंतला काहीही अवघड नव्हते त्यामुळे तुम्हाला एकट्याने गाडी चालवायची गरज नाही. मला समजते की लोकांना अशा गोष्टींचा छंद किंवा आवड असते. पंतच्या वयात हे होणे स्वाभाविक आहे. मात्र, तुमच्यावरही जबाबदाऱ्या आहेत. फक्त तुम्हीच स्वतःची काळजी घेऊ शकता. गोष्टी तुम्हीच ठरवाव्यात.”

आणखी वाचा: चाहत्यांच्या गर्दीमुळे ऋषभला विश्रांतीही मिळत नाही; पंतच्या कुटुंबीयांची तक्रार

खड्डे हे अपघाताचे कारण असल्याचा दावा या २५ वर्षीय क्रिकेटपटूने केला आहे. मात्र, उत्तराखंड पोलिसांच्या निवेदनात ऋषभ पंतला गाडी चालवताना झोप लागल्याचे म्हटले आहे. या सगळ्या दरम्यान कपिल देव म्हणाले की, “ऋषभ पंतने स्वत:ची काळजी घ्यावी कारण त्याच्यापुढे दीर्घ कारकीर्द आहे. हा एक धडा आहे. मी नवोदित क्रिकेटपटू असताना मला मोटारसायकल अपघाताला सामोरे जावे लागले होते. त्या दिवसापासून माझ्या भावाने मला मोटरसायकलला हातही लावू दिला नाही. ऋषभ पंत सुरक्षित असल्याबद्दल मी देवाचे आभार मानतो.”

हेही वाचा: ऋषभ पंतच्या उपचारांबाबत BCCI नं दिली महत्त्वाची माहिती; ‘गरज पडल्यास…’

पंतला उपचारासाठी परदेशात पाठवल्याची चर्चा

सध्या ऋषभ पंतवर डेहराडूनमध्ये उपचार सुरू असून बीसीसीआय डॉक्टर आणि वैद्यकीय पथकाच्या सतत संपर्कात आहे. त्याच्या अस्थिबंधनाबाबत काही रिपोर्ट्सची प्रतीक्षा आहे, त्यानंतर त्याला उपचारासाठी परदेशात पाठवले जाऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पंत यांच्या आईशी बोलून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, क्रिकेटरला आयसीयूमधून बाहेर काढून एका खाजगी खोलीत हलवण्यात आले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-01-2023 at 15:56 IST

संबंधित बातम्या