Rishabh Pant Monstrous Six IND vs NZ Video Viral: भारत-न्यूझीलंड बंगळुरू कसोटीत सर्फराझ खान आणि ऋषभ पंतच्या जोडीने चौथ्या दिवशी किवी संघावर चांगलाच दबाव टाकला. पण १५० धावा करताच सर्फराझ खान झेलबाद झाला. तर त्यानंतर ऋषभ पंत मोठ्या दुर्दैवीरित्या बाद होत माघारी परतला. विस्फोटक फलंदाजी करणारा पंत ९९ धावांवर बोल्ड झाल्याने संपूर्ण स्टेडियममध्ये एक भयाण शांतता पसरली. पण बाद होण्यापूर्वी ऋषभ पंतने टीम साऊदीच्या चेंडूवर असा काही षटकार लगावला की चेंडू थेट स्टेडियमच्या बाहेर गेला.

बंगळुरू कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात यष्टीरक्षक ऋषभ पंतचे सातवे कसोटी शतक अवघ्या एका धावेने हुकले. मात्र, ९९ धावांच्या खेळीतही त्याने असे काही फटके खेळले जे चकित करणारे होते. त्याने वेगवान गोलंदाज टिम साऊदीच्या चेंडूवर १०७ मी. लांब जबरदस्त षटकार ठोकला. पंतने हा षटकार ९० धावांवर असताना लगावला. त्याने सर्फराझ खानच्या साथीने चौथ्या विकेटसाठी १७७ धावांची भागीदारी करून भारताला संकटातून बाहेर काढले. दुखापत झालेली असूनही पंतने फलंदाजीसाठी उतरून मौल्यवान खेळी खेळली.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा – IND vs NZ: भारतीय संघाने घडवला इतिहास, १४७ वर्षांच्या कसोटी इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला संघ

भारताच्या डावातील ८७ वे षटक टीम साऊदी टाकत होता. साऊदीच्या षटकातील पहिल्या चेंडूवर पंतने बाय म्हणून चार धावा केल्या. साऊदीने दुसरा चेंडू शॉर्ट लेंथ होता, त्यावर पंतने केवळ बचाव केला. तिसऱ्या चेंडूवर, गुडघ्यावर बसत पंतने मिडविकेटवर स्लॉग स्वीप मारत १०७ मीटर लांब षटकार लगावला. ऋषभ पंतचा हा षटकार पाहून ग्लेन फिलिप्सला आश्चर्याचा धक्काच बसला.

हेही वाचा – IND vs NZ: ऋषभ पंतने झंझावाती अर्धशतकासह मोडला धोनीचा मोठा विक्रम, ‘ही’ कामगिरी करणारा पहिला यष्टीरक्षक फलंदाज

ऋषभ पंतच्या १०७ मी. गगनचुंबी षटकाराचा व्हीडिओ व्हायरल

पहिल्या डावात २० धावा करणारा ऋषभ पंतला न्यूझीलंडच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला मैदानबाहेर पडावे लागले होते. दुसऱ्या डावात तो फलंदाजीला येणार हे निश्चित नव्हते. मात्र या दुखापतीतून वर येत त्याने फलंदाजीला उतरत चांगली कामगिरी केली. काही महिन्यांपूर्वी ज्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती, त्याच पायाला दुखापत झाली होती.

हेही वाचा – IND vs NZ: “जेव्हा भारताला सर्वात जास्त…,” सचिन तेंडुलकरची सर्फराझ खानसाठी खास पोस्ट, पहिल्या शतकाबद्दल पाहा काय म्हणाला?

पहिल्या डावात ४६ धावांत गुंडाळलेल्या टीम इंडियाने दुसऱ्या डावात टीब्रेक पर्यंत ६ बाद ४३८ धावा केल्या होत्या. भारतीय संघाने आता न्यूझीलंडवर ८२ धावांची आघाडी घेतली आहे. भारताला या सामन्यात अजून काही महत्त्वपूर्ण धावांची आवश्यकता असणार आहे.

Story img Loader