भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत याचा कार अपघात झाल्यानंतर या अपघाताची निरनिराळ्या अंगाने चर्चा होत आहे. अपघाताचे अनेक कंगोरे तपासले जात आहेत. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते सेलिब्रिटी, क्रीडापटू यांच्यापर्यंत अनेकांनी या अपघाताची दखल घेतली आहे. अपघाताचे सीसीटीव्ही चित्रण समोर आल्यानंतर अनेकांनी अपघातासाठी ओव्हरस्पीडिंग हे एक कारण असू शकते? असा अंदाज लावला होता. तर काहींनी म्हटले होते की, ऋषभचा डोळा लागला म्हणून अपघात झाला असावा. पण खुद्द ऋषभनेच या अपघाताचे खरे कारण सांगितले आहे.

रुरकी येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर सध्या पंत देहरादूनच्या मॅक्स रुग्णालयात उपचार घेत आहे. याठिकाणी त्याला भेटण्यासाठी दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन (DDCA) ची टीम पोहोचली आहे. यावेळी डीडीसीएचे संचालक शायम शर्मा यांच्याशी बोलत असताना ऋषभ पंतने अपघाताबाबत नवा खुलासा केला आहे. पंत म्हणाला की, “गाडी चालवत असताना समोर एक खड्डा आला. खड्डा वाचवत असताना हा अपघात झाला.”

Anant Radhika's Pre-Wedding Ceremony Updates in Marathi
MS Dhoni : माही साक्षीसह अनंत राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी जामनगरला रवाना, VIDEO होतोय व्हायरल
team india kl rahul bcci
IND Vs ENG : केएल राहुल पाचव्या कसोटीलाही मुकणार, संघात दिग्गज खेळाडूचं पुनरागमन; अशी असेल टीम इंडिया
Pakistani Singer Shazia Manzoor Slaps Co host on Live Show
पाकिस्तानी गायिकेला ‘हनिमून’ विषयी विचारला प्रश्न; लाइव्ह शोमध्येच होस्टच्या कानाखाली लगावली, पाहा धक्कादायक व्हिडीओ
Fact check on pm Narendra Modi waving hand to fish viral video
सुदर्शन सेतू उद्घाटनावेळी पंतप्रधान मोदींनी ‘माशांना’ दाखवला हात? जाणून घ्या, व्हायरल Video मागील सत्य

हे ही वाचा >> “पंतनेच Google ला त्याचं नाव टाकून आम्हाला दाखवलं अन् त्यानंतर…; रुग्णालयात घेऊन गेलेल्या तरुणांनी सांगितला घटनाक्रम

श्याम शर्मा यांनी ऋषभ पंतला अपघाताचे कारण विचारले होते. यावेळी त्यांना उत्तर देत असताना पंत म्हणाला की, रात्रीची वेळ होती. समोर खड्ड्यासारखं मला काहीतरी दिसलं. म्हणून खड्डा वाचविण्याचा प्रयत्न मी केला. त्यामध्ये हा अपघात झाला.” श्याम शर्मा यांनी पुढे सांगितले की, सध्यातरी ऋषभ पंतच्या पुढीला उपचारासाठी त्याला एअरलिफ्ट करण्याची गरज नाही. त्याला दिल्लीला हलविले जाणार नाही. लेगामेंट उपचारासाठी जर लंडनला जायचे असेल तर त्याचा निर्णय बीसीसीआय घेईल.

हे ही वाचा >> Rishabh Pant Car Accident: ऋषभच्या चाहत्यांमध्ये वाढली अस्वस्थता; बीसीसीआयच्या मुख्यालयात फोन करून विचारतायेत ‘हे’ प्रश्न

कसा झाला होता अपघात

ऋषभ पंत दिल्लीहून रुरकी येथे आपल्या घरी आईला भेटण्यासाठी जात होता. दिल्ली-देहरादून महामार्गावर पहाटे ५.३० च्या सुमारास ही दुर्घटना घडली. उत्तराखंडमधील हरिद्धार जिल्ह्यात एका वळणावर पंतची गाडी दुभाजकावर आदळली आणि अनियंत्रित झाली. अपघातामुळे गाडी अनेकदा पलटली आणि पेट घेतला. पंतच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला मार लागला आहे. नजीकच्या सक्षम रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला देहरादून येथील रुग्णालयात हलवण्यात आलं.