scorecardresearch

वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या वनडेपूर्वी ऋषभ पंत झाला मालामाल; मिळणार ‘इतके’ कोटी!

उद्या (६ फेब्रुवारी) भारत आणि वेस्ट इंडीजमध्ये पहिला वनडे सामना रंगणार आहे.

rishabh pant signs one of the largest bat sponsorship deal
ऋषभ पंत

उद्या रविवारी (६ फेब्रुवारी) होणाऱ्या भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने करोडोंचा करार केला आहे. पंतने क्रिकेट किट बनवणारी कंपनी SG (Sanspareils Greenlands) सोबत ७ वर्ष जुन्या बॅट प्रायोजकत्व कराराचे नूतनीकरण केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा भारतातील सर्वात मोठा बॅट- प्रायोजकत्व करार आहे. पंत आता विराट कोहली आणि रोहित शर्मानंतर बॅट एंडोर्समेंटद्वारे भारतातील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा क्रिकेटपटू बनेल. वृत्तानुसार, पंतला त्याच्या बॅटवर एसजी लोगो वापरण्यासाठी वार्षिक ३ कोटी रुपये मिळतील.

यापूर्वी विराट कोहलीने MRFसोबत ८ वर्षांसाठी १०० कोटींचा बॅट स्पॉन्सरशिप करार केला होता. त्याच्याशिवाय रोहित शर्माही त्याच्या बॅटवरील कंपनीच्या लोगोमधून करोडोंची कमाई करतो. त्याने २०१८ मध्ये CEAT सोबत करार केला होता. या अंतर्गत कंपनी त्यांना दरवर्षी ४ कोटी रुपये देते. शिखर धवनला MRF बॅट स्पॉन्सरशिप डील अंतर्गत दरवर्षी २.५ कोटी रुपये दिले जात होते. मात्र, आता तो करार संपला आहे आणि सध्या तो कुकाबुराच्या बॅटने खेळतो.

हेही वाचा – IND vs WI : पहिल्या वनडेत ‘हा’ डावखुरा फलंदाज करणार ओपनिंग; रोहितचा खुलासा!

कंपनीसोबतचा करार वाढवल्यानंतर ऋषभ पंत म्हणाला, “मी एसजीची बॅट बर्‍याच काळापासून वापरत आहे. माझ्या अनेक संस्मरणीय खेळी या बॅटने आल्या आहेत. ही भागीदारी पुढे नेण्यात मला आनंद होत आहे.”

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rishabh pant signs one of the largest bat sponsorship deal adn

ताज्या बातम्या