टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक ऋषभ पंतचा काही दिवसांपूर्वी कार अपघात झाला होता. त्यानंतर मुंबईत जखमी ऋषभच्या लिगामेंट दुखापतीवर शस्त्रक्रिया केली आहे. यावर तज्ज्ञांच्या मत आहे की, शस्त्रक्रियेनंतर त्याला मैदानात परतण्यासाठी ६ महिन्यांहून अधिक कालावधी लागू शकतो. म्हणजेच पंत २०२३ च्या आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही. आता प्रश्न असा आहे की पंत जर आयपीएल खेळला नाही, तर त्याला १६ कोटी रुपये मिळतील का?

ज्या किमतीत दिल्ली कॅपिटल्सने या खेळाडूला आयपीएल २०२३ साठी कायम ठेवले आहे, तर त्याला पूर्ण पैसे मिळणार आहेत. पण हे पैसे फ्रँचायझी देणार नाही, तर बीसीसीआय देणार आहे.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
Advocates Black Coat is Optional in Summer Marathi News
Too Much Heat: प्रचंड उकाड्यामुळे वकिलांना ड्रेसकोडमधून सवलत; काय आहेत नियम?
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?
chip manufacturing infrastructure
पोस्टाच्या तिकिटाएवढी दिसणारी सेमीकंडक्टर चिप नक्की कशी तयार होते?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय या कठीण काळात ऋषभ पंतच्या पाठीशी उभे आहे. त्याच्या उपचाराचा सर्व खर्च फक्त बीसीसीआय उचलत नाही, तर त्याचे व्यावसायिक हितही जपण्याचा निर्णय घेतला आहे. पंत यंदा आयपीएलमध्ये खेळत नसला तरी, बीसीसीआय त्याचे आयपीएलचे १६ कोटी वेतन दिल्ली कॅपिटल्समधून पूर्ण करेल. इतकेच नाही तर, केंद्रीय करारांतर्गत त्याला मिळणाऱ्या वार्षिक रिटेनरशिप फीसाठी बोर्ड ५ कोटी रुपये एकरकमी पेमेंट देखील करेल. कारण पंत पुढील ६ महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे.

बीसीसीआय पंतला आयपीएलचे संपूर्ण वेतन देणार –

आता प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे की, जर पंतला दिल्ली कॅपिटल्सने १६ कोटी रुपयांना विकत घेतले होते. तसेच त्याला आयपीएल २०२३ साठी कायम ठेवले होते, तर पंतचा आयपीएल पगार बीसीसीआय का देईल? तर याचे कारण एक नियम आहे. वास्तविक, सर्व केंद्रीय करारबद्ध खेळाडूंचा विमा उतरवला जातो. बीसीसीआयच्या नियमांनुसार, या खेळाडूंना दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडल्यास बोर्डाकडून त्यांना पूर्ण मोबदला दिला जातो. संबंधित फ्रँचायझी नाही, तर विमा कंपनी वेतन देते.

हेही वाचा – VIDEO: मोठे शॉट्स खेळण्यासाठी सूर्यकुमार ‘या’ खेळाडूची करतो कॉपी; स्वत: केला खुलासा

ऋषभ पंतला बीसीसीआयने २०२१-२१ हंगामासाठी केंद्रीय करार यादीच्या श्रेणी-ए मध्ये स्थान दिले आहे. यामध्ये सहभागी खेळाडूंना वार्षिक रिटेनरशिप फी म्हणून ५ कोटी रुपये मिळतात. पंत दीर्घकाळ क्रिकेटपासून दूर राहणार आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआयने त्याला ही रक्कम एकरकमी देण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएल २०२२ च्या आधी दीपक चहरला दुखापत झाली होती. त्याला चेन्नई सुपरकिंग्सने १४ कोटींना विकत घेतले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयच्या नियमांनुसार त्याला पूर्ण पैसे मिळाले होते.