कार अपघातानंतर भारताचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. त्यांच्या प्रकृतीत सातत्याने सुधारणा होत आहे. पंत आगामी आयपीएलमध्ये खेळणार नाही. त्याच्या परतीला अजून पाच ते सहा महिने लागू शकतात. पंत त्याच्या चाहत्यांना त्याच्या फिटनेसबाबत सोशल मीडियावर अपडेट देत असतो. त्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो पूलमध्ये फिरताना दिसत आहे.

पंत काठीच्या साहाय्याने तलावात फिरत आहे. सध्या त्याला चालण्यासाठी आधाराची गरज आहे. व्हिडिओ शेअर करताना पंतने कॅप्शनमध्ये लिहिले की, “छोट्या गोष्टींसाठी, मोठ्या गोष्टींसाठी कृतज्ञ आहे.” पंतचा हा व्हिडिओ भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनाही आवडला आहे. त्याने कमेंटमध्ये लिहिले की, ‘कीप इट अप पंत! असे म्हटले आहे.’ त्याचवेळी इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन पंतच्या तब्येतीत सुधारणा झाल्याने खूप खूश दिसत होता. त्याने कमेंटमध्ये ‘क्लॅप’ इमोजी शेअर केला आहे.

uddhav thackeray slams narendra modi during in an interview with the indian express
मोफत धान्य देण्यापेक्षा रोजगार का देत नाही? ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांचा मोदींना सवाल
high court ask Questions to bmc and sent notice over Tragic Deaths of children in Wadala
दोन मुलांच्या मृत्यूचे प्रकरण: मुंबईत मानवी जिवाची किंमत काय? उच्च न्यायालयाचा महापालिकेला प्रश्न
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!
Rashmi Barve
रश्मी बर्वे प्रकरणावर बुधवारी सुनावणी, जातवैधता प्रमाणपत्रामुळे निवडणूक अर्ज रद्द

पंतने बुद्धिबळ खेळतानाचा फोटो शेअर केला आहे

पंतने नुकतेच दोन पोस्टद्वारे आपल्या मनात काय चालले आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. पंतने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये बुद्धिबळ खेळतानाचा पहिला फोटो शेअर केला आहे. त्याला बुद्धिबळ खेळायला खूप आवडते. बुद्धिबळाच्या खेळाप्रमाणे क्रिकेटच्या मैदानावरही सर्व काही झटपट बदलण्यात तो पटाईत आहे. असा सवालही त्यांनी चाहत्यांना विचारला. पंतने फोटो शेअर करताना लिहिले, “कोण खेळत आहे याचा अंदाज लावू शकतो का?” यानंतर पंतने त्याच्या दुसऱ्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक छोटा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो टेरेसवर बसला होता. त्याचा एक व्हिडिओ त्याच्या एका मित्राने बनवला होता. वादळात पंत गच्चीवर बसले होते.

हेही वाचा: IND vs AUS: “तिसऱ्या दिवशीच आम्ही बॅग पॅक…”, २००१च्या ईडन गार्डन्स कसोटीबाबत भारताच्या माजी खेळाडूचा खुलासा

३० डिसेंबर रोजी पंतचा अपघात झाला होता

गेल्या वर्षाच्या अखेरीस ३० डिसेंबर रोजी पंत रस्त्यावर अपघातात बळी पडले होते. रुरकीजवळ त्यांच्या कारला अपघात झाला. या अपघातात पंत गंभीर जखमी झाले होते. प्राथमिक उपचारानंतर त्यांना मुंबईला हलवण्यात आले. उपचारानंतर ते घरी आहेत. अपघातात ऋषभ पंतला बराच मार लागला आणि तो आता बराच काळ क्रिकेटपासून दूर राहणार आहे. काही दिवसांपूर्वी त्याने एक फोटो पोस्ट केला होता आणि त्यात तो कुबड्यांच्या, काठीच्या सहाय्याने चालत असल्याचे दिसला.३० डिसेंबर २०२२ मध्ये पहाटे ५.३० वाजता दिल्ली-डेहरादून हायवेवर ऋषभच्या गाडीचा भिषण अपघात झाला होता. या अपघातामुळे त्याला इंडियन प्रीमिअर लीग २०२३ सोबतच एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेलाही मुकावे लागू शकते. तो पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी बराच कालावधी लागू शकतो.