भारतीय संघाचा कर्णधार बनलेल्या रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहने इंस्टाग्रामवर युझवेंद्र चहलला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. पण फिरकीपटू चहलने दिलेल्या प्रत्युत्तराने रितिका सजदेहने उत्तर देणे टाळले. युझवेंद्र चहलने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये रोहित शर्मा आणि ऋषभ पंत त्याच्यासोबत उभे आहेत.
हा फोटो शेअर करताना युजवेंद्र चहलने चाहत्यांना या फोटोला कॅप्शन देण्यास सांगितले. या पोस्टवर सूर्यकुमार यादव आणि रितिका यांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.




रितिकाने कमेंटमध्ये ‘माफ करा पण रोहित माझा नंबर वन आहे’ (sorry boys but rits is my number one) असे म्हटले आहे. यावर युझवेंद्रने उत्तरात ‘इथे वहिणी आमच्यावर जळत आहेत’ असे म्हटले आहे. यानंतर सूर्यकुमार यादवने त्या फोटोवर कमेंटमध्ये ‘तेजा मैं हूं निशान यहाँ है’ असे म्हटले आहे. या फोटोत रोहितच्या गालावर पट्टी बांधलेली आहे. कदाचित हे पाहून सूर्यकुमारने ही कमेंट केल्याची शक्यता आहे. त्यावर चहलने गुड वन भाऊ असे लिहिले आहे.


दरम्यान, भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि शेवटचा टी-२० सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळला गेला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने सात गडी गमावून १८४ धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ ७३ धावांनी पराभूत झाला. यासह भारताने ३-० असा क्लीन स्वीप केला आहे. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक धावा केल्या. रोहित शर्माने ५६ धावांची खेळी खेळली. न्यूझीलंडकडून मार्टिन गप्टिलने ५१ धावा केल्या. यासह अक्षर पटेलने सुरुवातीलाच धक्के देत न्यूझीलंडला बॅकफूटवर ढकलले होते.