Rivaba Jadeja’s reaction after Ravindra Jadeja dropped the catch: भारतीय क्रिकेटच्या इतिहासात रवींद्र जडेजाइतका वेगवान आणि चपळ क्षेत्ररक्षक क्वचितच असेल. जडेजाने आपल्या कारकिर्दीत अनेक अप्रतिम झेल घेतले आहेत, पण न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात एक असा झेल सोडला, जो इतर दिवशी त्याने डोळे मिटूनही पकडला असता. रविवारी भारत आणि न्यूझीलंडमध्ये खेळल्या जात असलेल्या विश्वचषकाच्या सामन्यात जडेजाने रचिन रवींद्रचा एक सोपा झेल सोडला, जे पाहून धर्मशाला स्टेडियमवर उपस्थित असलेल्या त्याच्या पत्नी रिवाबा जडेजासह चाहतेही आश्चर्यचकित झाले. ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ही घटना किवी डावाच्या ११व्या षटकात घडली. जेव्हा मोहम्मद शमीने आपले षटक टाकायला आला होता. मोहम्मद शम्मीच्या षटकातील चौथ्या चेंडूवर रचिन रवींद्रने मिड-ऑनच्या दिशेने चौकार मारला. पुढच्या चेंडूवर रचिनने स्क्वेअर लेगच्या दिशेने कट केला, पण तिथे उपस्थित क्षेत्ररक्षक जडेजाच्या हातात चेंडू गेला पण त्याला तो पकडता आला नाही. रवींद्र जडेजाच्या हातून झेल सुटलेला पाहून स्टँडमध्ये बसलेल्या त्याची पत्नी रिवाबाला आश्चर्याचा धक्काच बसला. मात्र, गोलंदाज मोहम्मद शमीने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. जडेजा क्वचितच अशा चुका करतो, हे त्याला माहीत असल्याने तो आपल्या क्षेत्ररक्षकावर चिडला नाही.

२० वर्षांपासून न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी स्पर्धेत जिंकला होता सामना –

टीम इंडियाला गेल्या २० वर्षांपासून न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी स्पर्धेत सामना जिंकता आलेला नाही. २००३ च्या विश्वचषक स्पर्धेत भारताने न्यूझीलंडचा शेवटचा पराभव केला होता. त्यावेळी सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारताने ७ विकेटने विजयी मिळवला होता. यानंतर न्यूझीलंडने टी-२० विश्वचषक २००७ आणि टी-२० विश्वचषक २०१६ सह एकदिवसीय विश्वचषक २०१९ च्या उपांत्य फेरीत भारताचा पराभव केला. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२१ आणि टी-२० वर्ल्ड कप २०२१ च्या अंतिम फेरीत भारताचा न्यूझीलंडकडून पराभव झाला होता.

हेही वाचा – World Cup 2023: ‘…म्हणून धोनीला मोठ्या स्पर्धेत एक सामना गमवायचा होता’; रवी शास्त्रींनी केला मोठा खुलासा

भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड: डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार आणि यष्टिरक्षक), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.

Story img Loader