Riyan Parag Reaction On Sanju Samson Wicket: आयपीएल २०२६ स्पर्धेतील तिसरा सामना राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. हा सामना गुवाहाटीतील बारसापरा क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. रियान पराग पहिल्यांदाच राजस्थान रॉयल्स संघाचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून मैदानात उतरला आहे. रियानच्या नेतृत्वाखाली खेळताना राजस्थान रॉयल्स संघाने दमदार सुरूवात केली. पावरप्लेमध्येच राजस्थान रॉयल्स संघाचे ४ प्रमुख फलंदाज माघारी परतले होते. दरम्यान चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून आपला पहिलाच सामना खेळत असलेला संजू सॅमसन स्वस्तात माघारी परतला.

नांद्रे बर्गरच्या गोलंदाजीवर संजू सॅमसनची बत्ती गुल

राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय राजस्थानच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसनची जोडी डावाची सुरूवात करण्यासाठी मैदानात आली. पण ही जोडी चांगली सुरूवात करून देऊ शकली नाही. चेन्नई सुपर किंग्जकडून दुसरे षटक टाकण्यासाठी नांद्रे बर्गर गोलंदाजीला आला. त्यावेळी संजू सॅमसन स्ट्राईकवर होता. षटकातील शेवटचा चेंडू त्याने गुड लेंथवर टाकला. हा चेंडू टप्पा पडताच वेगाने बाहेर गेला आणि यष्टीला जाऊन धडकला.

संजूने वेगाने बॅट फिरवली होती. पण भन्नाट गतीने टाकलेला चेंडू थेट यष्टीला जाऊन धडकला आणि संजू अवघ्या ७ चेंडूत अवघ्या ६ धावा करून माघारी परतला. संजू बाद होताच, रियान परागचं अॅग्रेशन पाहायला मिळालं. त्याने दिलेल्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. संजू सॅमसन गेल्या हंगामात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार होता. यावेळी तो चेन्नईचं प्रतिनिधित्व करत आहे. तर रियान पराग पहिल्यांदाच राजस्थान रॉयल्सच्या पूर्णवेळ कर्णधाराची भूमिका पार पाडत आहे.

संजू सॅमसन गेल्या हंगामापर्यंत राजस्थान रॉयल्स संघाचा भाग होता. पण आयपीएल २०२६ स्पर्धेच्या मिनी ऑक्शनआधी चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स संघात ट्रेड झाला होता. संजू सॅमसनने राजस्थानची साथ सोडून चेन्नई सुपर किंग्ज संघात प्रवेश केला. तर चेन्नई सुपर किंग्ज संघातील अनुभवी खेळाडू रवींद्र जडेजाने राजस्थान रॉयल्स संघात प्रवेश केला.