Riyan Parag Angry on Vaibhav Sooryavanshi: आक्रमक वैभव सूर्यवंशीची गुजरात टायटन्सविरूद्ध दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात सावध व झुंजार खेळी पाहायला मिळाली. राजस्थान आणि गुजरात यांच्यात दुसरा क्वालिफायर सामना खेळवला जात असून राजस्थानने संघाला विजयासाठी २१५ धावांचं आव्हान दिलं आहे. या मोठ्या धावसंख्येचा पाया वैभव सूर्यवंशीने रचला, पण सूर्यवंशीचं शतक मात्र ४ धावांनी हुकलं. वैभव ९६ धावांवर बाद होत माघारी परतला, यानंतर संघाचा कर्णधार रियान पराग त्याच्यावर संतापत त्याला ओरडताना दिसला, ज्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

वैभव सूर्यवंशीने गुजरात टायटन्सविरुद्धच्या या सामन्यात ४७ चेंडूंमध्ये ८ चौकार आणि ७ षटकारांसह ९६ धावांची शानदार खेळी केली. कागिसो रबाडाने टाकलेल्या एका शॉर्ट बॉलवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात वैभव बाद झाला, तेव्हा शतक हुकल्याची त्याची निराशा त्याच्या प्रतिक्रियेत स्पष्टपणे दिसत होती. पॅव्हेलियनमधून बाहेर पडताना वैभव सूर्यवंशी स्वतःवर खूप रागावलेला दिसत होता, पण स्टेडियममधील सर्व चाहत्यांनी त्याच्या खेळीचे कौतुक केलं.

रियान पराग बाद झाल्यावर वैभव सूर्यवंशीवर संतापला

बाद झाल्यानंतर निराश होत वैभव डगआऊटमध्ये बसला होता. डगआऊटमध्ये बसलेल्या वैभव आणि कर्णधार रियान पराग यांच्यातील संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने २० षटकांत ६ गडी गमावून २१४ धावा केल्या. दरम्यान वैभवने ४७ चेंडूत ८ चौकार व ७ षटकारांसह ९६ धावांची खेळी केली.

वैभव सूर्यवंशीने गुजरात टायटन्सविरुद्ध थोड्या वेगळ्या शैलीत खेळताना आपल्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वात संथ अर्धशतक झळकावलं. त्याच्या झुंजार खेळीमुळे दुसऱ्या क्वालिफायरमध्ये राजस्थान रॉयल्सला २०० धावांचा टप्पा ओलांडण्यास मदत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आपली विकेट गमावल्यानंतर वैभव सूर्यवंशी डगआऊटमध्ये बसला असताना, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग त्याच्याजवळ गेला आणि रागात त्याला बोट दाखवत काहीतरी म्हणाला. वैभवसुद्धा थोडा निराश दिसत होता.

रियान पराग व वैभव सूर्यवंशीच्या या क्षणाचा व्हीडिओ सध्या चांगलाच व्हायर होत आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात नाईन्टीजमध्ये सर्वाधिक बळी घेण्याच्या बाबतीत वैभव सूर्यवंशीने आता डेव्हिड वॉर्नर, केएल राहुल, ग्लेन मॅक्सवेल आणि ऋतुराज गायकवाड यांच्याशी बरोबरी साधली आहे. वैभवने एकाच हंगामात नाईन्टीजमध्ये सर्वाधिक वेळा बाद होण्याच्या बाबतीतही ग्लेन मॅक्सवेलची बरोबरी साधली आहे, तसेच दोन्ही फलंदाज तीन वेळा शतक पूर्ण करण्यापासून थोडक्यात मुकले आहेत.