रिझवान, ब्युमाँट सर्वोत्तम ट्वेन्टी-२० क्रिकेटपटू; ‘आयसीसी’कडून घोषणा; मलान, साना सर्वोत्तम उदयोन्मुख क्रिकेटपटू

गतवर्षी ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये रिझवानने छाप पाडली. त्याने २०२१मधील २९ सामन्यांत ७३.६६च्या सरासरीने १३२६ धावा काढल्या.

‘आयसीसी’कडून घोषणा; मलान, साना सर्वोत्तम उदयोन्मुख क्रिकेटपटू

पाकिस्तानचा यष्टीरक्षक-फलंदाज मोहम्मद रिझवान आणि इंग्लंडची टॅमी ब्युमाँट यांची २०२१ या वर्षांतील अनुक्रमे सर्वोत्तम पुरुष आणि महिला ट्वेन्टी-२० क्रिकेटपटू म्हणून रविवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) घोषणा करण्यात आली आहे.

गतवर्षी ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये रिझवानने छाप पाडली. त्याने २०२१मधील २९ सामन्यांत ७३.६६च्या सरासरीने १३२६ धावा काढल्या. धडाकेबाज फलंदाजी आणि कुशल यष्टीरक्षण या कर्तृत्वाच्या बळावर रिझवानने पाकिस्तानला ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत नेले होते. या स्पर्धेत सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांमध्ये त्याचा तिसरा क्रमांक लागला. ब्युमाँटने गतवर्षी ट्वेन्टी-२० प्रकारात तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा काढल्या, तर इंग्लंडकडून सर्वाधिक धावा काढल्या.

‘आयसीसी’च्या सहयोगी राष्ट्रांपैकी वर्षांतील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून पुरुषांमध्ये झीशान मकसूद (ओमान) आणि महिलांमध्ये आंद्रिआ-माई झेपेडा (ऑस्ट्रिया) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर जानेमन मलान आणि पाकिस्तानची वेगवान गोलंदाज फातिमा साना वर्षांतील सर्वोत्तम उदयोन्मुख क्रिकेटपटू ठरले. मलान २०२१मध्ये ८ एकदिवसीय आणि ९ ट्वेन्टी-२० सामने खेळला. तसेच २० वर्षीय सानाने पाकिस्तानचे एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० प्रकारात प्रतिनिधित्व करताना अष्टपैलू चमक दाखवली.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rizwan beaumont is the best twenty20 cricketer announcement from icc akp

Next Story
VIDEO : राष्ट्रगीत सुरू असताना विराटनं केला ‘लाजिरवाणा’ प्रकार; नेटकऱ्यांनी म्हटलं, ”तू पाकिस्तानात जा!”
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी