भेदक गोलंदाजी आणि रॉबिन उथप्पा व उन्मुक्त चंद यांच्या दमदार दीड शतकी सलामीच्या जोरावर भारतीय ‘अ’ संघाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंड ‘अ’ संघावर सहा फलंदाज आणि ३५ चेंडू राखत सहज विजय मिळवला.
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत फलंदाजी स्वीकारली, पण त्यांचा हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करत चुकीचा ठरवला. धवल कुलकर्णी, राहुल शर्मा आणि अशोक मनेरिया यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवल्याने न्यूझीलंडला २५७ धावांपर्यंतच मजल मारता आली. या आव्हानाचा पाठलाग करताना उथप्पा (१०३) आणि चंद (९४) यांनी १७८ धावांची दणदणीत सलामी दिल्याने भारताला पहिला सामना आरामात जिंकता आला.