रोहन बोपन्ना आणि फ्लोरिन मर्गीआ या चौथ्या मानांकित जोडीने एटीपी मर्सिडिस चषक टेनिस स्पध्रेचे जेतेपद आपल्या नावावर केले. त्यांनी तिसऱ्या मानांकित ब्राझीलच्या ब्रुनो सोआरेस आणि ऑस्ट्रियाच्या अ‍ॅलेक्झांडर पेया या जोडीचा पराभव करून सत्रातील दुसरे जेतेपद पटकावले.
भारत-रोमानिया जोडीने अंतिम फेरीत ०-१ अशा पिछाडीवरून पुनरागमन करत १ तास ११ मिनिटे चाललेल्या सामन्यात ५-७, ६-२, १०-७ अशी बाजी मारली. बोपन्ना-मर्गीआ जोडीने गतमहिन्यात माद्रिद मास्टर्सचे जेतेपद पटकावले होते. बोपन्नाचे हे सत्रातील वैयक्तिक चौथे जेतेपद आहे.

Story img Loader