कर्णधार रोहित शर्मा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे, त्याच्या जागी आता केएल राहुलकडे भारतीय टीमचं नेतृत्व देण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोहम्मद शमीला विश्रांती देण्यात आली आहे, तर रविचंद्रन अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांनी शुक्रवारी फेसबुक लाईव्हवर याची घोषणा केली. यापूर्वी रोहित शर्माला वनडे संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते.

वनडे मालिकेसाठी भारतीय संघ –

केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, ऋषभ पंत (डब्ल्यूके), इशान किशन (डब्ल्यूके), युजवेंद्र चहल , रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, प्रणंद कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी फिरकीपटू रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांची निवड करण्यात आलेली नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना १९ जानेवारी, दुसरा २१ आणि तिसरा २३ जानेवारीला खेळवला जाणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit ruled out of odi series in sa rahul named captain msr
First published on: 31-12-2021 at 22:34 IST