scorecardresearch

Premium

Australia Won World Cup 2023 Final: रोहित शर्मानं सांगितलं अंतिम सामन्यातील पराभवाचं कारण; म्हणाला, “कदाचित…!”

Cricket World Cup 2023, IND vs AUS Final: रोहित शर्मा म्हणाला, “जेव्हा विराट कोहली आणि के. एल. राहुल खेळत होते, तेव्हा आम्ही…!”

rohit sharma on ind vs aus final match marathi
रोहित शर्मानं अंतिम सामन्यातील पराभवावर दिली प्रतिक्रिया (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Australia Won ICC Cricket World Cup 2023 against India: यंदाच्या विश्वचषक स्पर्धेमध्ये गेल्या १० सामन्यांमध्ये भारतीय संघानं तुफान कामगिरी करत अंतिम फेरीत धडक मारली होती. एकही सामना न गमावणारा भारतीय संघ विश्वचषक विजयासाठी पहिली पसंती ठरला होता. मात्र, अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं ६ विकेट्सनं भारताचा पराभव करत तमाम भारतीय क्रिकेट चाहत्यांचं विजेतेपदाचं स्वप्न भंग केलं. या पराभवावर आता क्रिकेट जाणकार व आजी-माजी क्रिकेटपटूंमध्ये चर्चा सुरू झाली आहे. खुद्द कर्णधार रोहित शर्मानं या पराभवामागचं कारण सांगितलं आहे.

ग्लेन मॅक्सवेलनं विजयी फटका मारल्यानंतर एकीकडे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू जल्लोष करत मैदानात येत असताना दुसरीकडे भारतीय खेळाडूंना भावना अनावर झाल्याचं दिसत होतं. खुद्द कर्णधार रोहित शर्मालाही अश्रू अनावर झाले. सघळ्यांना हस्तांदोलन केल्यानंतर रोहित शर्मा वेगाने ड्रेसिंग रुमच्या दिशेनं मैदानाबाहेर पडला. यावेळी त्याच्या डोळ्यांत अश्रू स्पष्टपणे दिसत होते.

Laxman Sivaramakrishnan's Controversial Statement About Ashwin
Ravichandran Ashwin: माजी खेळाडूचे आश्विनबाबत वादग्रस्त वक्तव्य; म्हणाला, “जर CSK आणि MSD नसते, तर त्याला…”
Esha Gupta faced casting couch twice
“मी नकार दिल्यावर सहनिर्मात्याने…”, इशा गुप्ताने सांगितले कास्टिंग काउचचे धक्कादायक अनुभव; म्हणाली, “दोघे जण…”
The name is enough Yuzvendra Chahal said a big thing by tweeting about Ravichandran Ashwin's bowling
Yuzvendra Chahal: आर. अश्विनची दमदार कामगिरी अन् चहलची पोस्ट आली चर्चेत; म्हणाला, “फक्त हे नावच…”
Shoaib Akhtar Disgusting Boast Video Of IND vs PAK Says Wanted To Hurt Thought Sachin Tendulkar Died Felt Bad For MS Dhoni
“मला वाटलं सचिन मेला, मी मुद्दाम..”, शोएब अख्तरची धक्कादायक कबुली! तेंडुलकर, धोनी विरुद्ध रचला डाव

“मला माझ्या सहकाऱ्यांचा अभिमान आहे”

सामन्यानंतरच्या कार्यक्रमात रोहित शर्माला रवी शास्त्रींनी पराभवासंदर्भात प्रतिक्रिया विचारली असता रोहित शर्मानं आपल्या सहकाऱ्यांच्या कामगिरीवर अभिमान असल्याचं ताठ मानेनं सांगितलं. “सामन्याचा निकाल आमच्या बाजूने लागला नाही. आज आम्ही विजयासाठी आवश्यक तेवढा चांगला खेळ करू शकलो नाही याची आम्हाला कल्पना आहे. पण मला संघातल्या प्रत्येकाच्या कामगिरीचा अभिमान आहे”, असं रोहित शर्मा यावेळी म्हणाला.

Ind vs Aus Final: अंतिम सामन्यातील पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माला अश्रू अनावर, सगळ्यांना हस्तांदोलन करून होताच…

“विराट-राहुल फलंदाजी करत होते तेव्हा…”

“खरंतर आणखी २०-३० धावा झाल्या असत्या, तर कदाचित आम्हाला आणखी मदत झाली असती. जेव्हा विराट कोहली आणि के. एल. राहुल खेळत होते, तेव्हा आम्ही २७०-२८० धावांचं लक्ष्य समोर ठेवलं होतं. पण सातत्याने आमचे गडी बाद होत गेले”, असं रोहित शर्मानं यावेळी कबूल केलं.

ट्रेविस हेड-मार्नस लाबुशेनचं कौतुक

दरम्यान, यावेळी बोलताना रोहित शर्मानं ट्रेविस हेड व मार्नस लाबुशेन यांच्या भागीदारीचं कौतुक केलं. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी १९२ धावांची विजयी भागीदारी केली. “तीन गडी बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी एक मोठी भागीदारी रचली. २४० धावा फलकावर लागल्या असताना आम्हाला सुरुवातीला गडी बाद करणं आवश्यक होतं. आम्ही त्यांचे तीन गडी बाद केलेही. पण ऑस्ट्रेलियाच्या विजयाचं श्रेय ट्रेविस हेड व मार्नस लाबुशेन यांना दिलं पाहिजे”, असं रोहित शर्मानं नमूद केलं.

“त्यांनी हा सामना आमच्या हातातून काढून नेला. मला वाटतं संध्याकाळी खेळपट्टी फलंदाजीसाठी आणखी चांगली झाली. हे असं होईल याची आम्हाला कल्पना होती. पण अर्थात, या पराभवासाठी मला ते कारण द्यायचं नाहीये. आम्ही चांगली फलंदाजी केली नाही. या विजयाचं श्रेय नक्कीच ट्रेविस हेड व मार्नस लाबुशेन यांच्या भागीदारीला जातं”, असं रोहितनं मान्य केलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rohit sharma after ind vs aus final says proud of team lack batting pmw

First published on: 19-11-2023 at 22:41 IST

संबंधित बातम्या

क्विझ ×