T20 World Cup: भारताची सलामीची जोडी ठरली; ‘हे’ दोन खेळाडू करणार ओपनिंग

आयपीएल स्पर्धेतून अनेक प्रतिभावंत खेळाडू समोर आले आहेत. रोहित शर्मा, केएल राहुल, इशान किशन यांनी आयपीएलमध्ये फ्रेंचाइसी संघासाठी सलामीला फलंदाजी केली आहे.

Team_India-Opener
T20 World Cup: भारताची सलामीची जोडी ठरली; 'हे' दोन खेळाडू करणार ओपनिंग

टी २० वर्ल्डकपपूर्वी खेळल्या गेलेल्या आयपीएल स्पर्धेतून अनेक प्रतिभावंत खेळाडू समोर आले आहेत. रोहित शर्मा, केएल राहुल, इशान किशन यांनी आयपीएलमध्ये फ्रेंचाइसी संघासाठी सलामीला फलंदाजी केली आहे. रोहित शर्मा आणि इशान किशननं मुंबई इंडियन्ससाठी सलामीला फलंदाजी केली आहे. ही जोडीही आयपीएलमध्ये हिट ठरली होती. त्यामुळे भारतीय संघासाठी सलामीची जोडी कोण असणार? याबाबत प्रश्नचिन्ह होतं.

रोहित शर्मा सलामीला येणार हे निश्चित होतं. मात्र त्याच्यासोबत सलामीला दुसरा फलंदाज कोण? याबाबत खलबतं सुरु होती. अखेर या प्रश्नाला पूर्णविराम मिळाला आहे. रोहित शर्मासोबत सलामीला केएल राहुल येणार आहे. केएल राहुल चांगलाच फॉर्मात आहे. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याने चांगली कामगिरी केली होती. त्याचबरोबर आयपीएल २०२१ स्पर्धेत पंजाब किंग्सचं कर्णधारपद भूषविताना त्याने आक्रमक खेळी केली होती. आयपीएलच्या अंतिम सामन्यापूर्वी तो ऑरेंज कॅपचा मानकरी होता.

दुसरीकडे, हार्दिक पूर्णपणे तंदुरुस्त नाही. आयपीएल २०२१ मध्येही त्याने गोलंदाजी केली नाही. अशा परिस्थितीत वेगवान गोलंदाजीबरोबरच आक्रमक फलंदाजी करणाऱ्या शार्दुलला संघात स्थान देण्यात आले आहे. पहिल्यांदा वर्ल्डकप संघ जाहीर झाला, तेव्हा शार्दुल स्टँडबाय खेळाडूंमध्ये होता. आता अक्षरने त्याची जागा घेतली आहे. आवेश खान, उमरान मलिक, हर्षल पटेल, लुकमन मेरीवाला, व्यंकटेश अय्यर, कर्ण शर्मा, शाहबाज अहमद आणि के. गौथम हे खेळाडू दुबईत संघाच्या बायो बबलमध्ये सामील होतील आणि टीम इंडियाला त्यांच्या तयारीमध्ये मदत करतील.

T20 WC: ४ चेंडूत ४ बळी..! आयर्लंडच्या कॅम्फरनं नोंदवली यंदाच्या स्पर्धेतील पहिलीवहिली हॅटट्रीक

टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, रवीचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी

स्टँड-बाय खेळाडू: श्रेयस अय्यर, दीपक चहर, अक्षर पटेल

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rohit sharma and kl rahul opener for team india rmt

Next Story
ऑलिम्पिक पदकात पुण्याचाही वाटा -सायना
ताज्या बातम्या