बॉक्स ऑफीसवर दमदार कामगिरी करणारा ‘बाहुबली-२’ आणि आयपीएलचे जेतेपद जिंकून ‘बाहुबली’ ठरलेल्या मुंबई इंडियन्स संघाचाच सोशल मीडियावर बोलबाला सुरू आहे. हजारो कोटींची उड्डाणं घेणाऱ्या ‘बाहुबली-२’ ने तिकीट बारीवर दमदार कामगिरी केली. तर आयपीएलचं तिसऱ्यांदा जेतेपद पटकावून मुंबई इंडियन्सने सर्वांच्या मनात जागा निर्माण केली. प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडलेल्या ‘बाहुबली-२’ आणि ‘मुंबई इंडियन्स’च्या लोकप्रियतेची झलक आपल्याला सोशल मीडियावरही पाहायला मिळत आहे.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि ‘बाहुबली-२’मधील संवादांची सांगड घालून एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. स्मिथच्या रायझिंग पुणे सुपरजायंटला पराभूत करून आयपीएलच्या चषकरावर नाव कोरणाऱ्या रोहित शर्माला या व्हिडिओमध्ये ‘बाहुबली’ संबोधण्यात आलं आहे. मुंबई इंडियन्समधील घटकांना ‘बाहुबली’तील व्यक्तिरेखेंशी कसं जोडलंय हे तुम्ही पाहाच..

पुण्याविरुद्धच्या सामन्यात धावफलकावर केवळ १३० धावा केल्या असतानाही एखाद्या योद्धाप्रमाणे संघाचे नेतृत्त्व करणारा रोहित शर्मा व्हिडिओत म्हणतो…’अमरेंद्र बाहुबली यानी..मैं’

रोहितच्या या वाक्यानंतर वर्ल्डकप सामन्यावेळी प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं स्टेडियम अर्थात ”माहिश्मती देवी की असंख्य प्रजा..मान, सन्मान, धर्म (भारतीय प्रेक्षकांसाठी क्रिकेट हा धर्मच) और प्राण की रक्षा करूंगा”

व्हिडिओमध्ये शिवगामी देवीचाही उल्लेख करण्यात आलांय. ”राजमाता शिवगामी देवी को साक्षी मानकर (निता अंबानी) मैं ये शपथ लेता हूं..” असं म्हटल्यानंतर अंगावर शहारे आणणारं ‘बाहुबली’चं संगीत व त्यावर ‘हिटमॅन’ रोहित शर्माची तुफान बॅटिंग..हे सगळं छान जुळून आलंय..
सोशल मीडियाच्या ‘व्हायरल’ जगात नेटिझन्सच्या कल्पनाशक्तीला तोड नाही हे या व्हिडिओतून पुन्हा एकदा सिद्ध झालं.