Rohit Sharma Sixes record in England: भारतीय क्रिकेट संघाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात सहज विजय मिळवला होता आणि आता दुसऱ्या सामन्यात फलंदाजी करताना चांगल्या सुरूवातीनंतर टीम इंडियाचा संघ २३४ धावांवर सर्वबाद झाला. या सामन्यात भारतीय सलामीवीर रोहित शर्माने मात्र मोठी निराशा केली; ‘हिटमॅन’ने चांगली सुरुवात केली असली, तरी एका खराब फटक्यामुळे त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलं. या अपयशानंतरही, रोहित शर्माने या सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली.
प्रथम फलंदाजी करताना भारताने चांगली सुरूवात केली. शुबमन गिल बाद झाल्यानंतर विराट कोहली व रोहित शर्माने संघाचा डाव सावरला. रोहितने सावधतेने खेळत परिणामी आक्रमक शॉट खेळत खेळी साकारत होता, पण एका फटक्यामुळे तो धावबाद झाला. यानंतर विराटने ६५ धावांची तर श्रेयस अय्यरने ६६ धावांची खेळी केली. पण इतर सर्व फलंदाज फेल ठरले. याशिवाय बुमराहने खालच्या फळीत नाबाद २० धावांचं चांगलं योगदान दिलं. यासह भारतीय संघ ४४ षटकांत २३३ धावांवर सर्वबाद झाला. आता इंग्लंडला विजयासाठी २४३ धावांची गरज आहे.
टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ४७ चेंडूंत केवळ २६ धावा केल्या; त्याच्या या खेळीत एका चौकाराचा आणि एका षटकाराचा समावेश होता. यासह ‘हिटमॅन’ने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आता त्याच्या नावावर आहे.
यापूर्वी रोहित शर्मा आणि ऋषभ पंत या दोघांच्याही नावावर ५५ षटकारांची नोंद होती; मात्र, आता हिटमॅनने ५६ षटकारांचा टप्पा गाठला आहे. अनुभवी युवराज सिंगने ५३ षटकार मारले आहेत, तर एम.एस. धोनीने इंग्लंडविरुद्ध ५२ षटकार मारले आहेत. हिटमॅनला दोन्ही डावांत चांगली कामगिरी करता आली नव्हती, त्यामुळे तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याच्यावर प्रचंड दडपण असेल.
इंग्लंडविरूद्ध सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय फलंदाज
रोहित शर्मा – ५६
ऋषभ पंत – ५५
युवराज सिंग – ५३
एम एस धोनी – ५२
हार्दिक पंड्या – ४३
सुरेश रैना — ४०
