Rohit Sharma Reaches 12000 ODI Runs Record Milestone: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना खेळवला जात आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने विक्रमी धावसंख्या उभारली आहे. विडिंज संघाने या सामन्यात ४०५ धावांचा डोंगर उभारला. दरम्यान भारताला जर सामना जिंकायचा असेल तर त्यांना ऐतिहासिक रनचेस करावा लागणार आहे. रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी या लक्ष्याचा पाठलाग करताना चांगली सुरूवात केली आहे. दरम्यान रोहित शर्माने मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.

रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेट इतिहासात १२ हजार धावांचा टप्पा गाठला आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ७३ धावा करताच रोहितने हा पराक्रम आपल्या नावे केला. रोहितने २८२ डावांमध्ये १२ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. यासह १२ हजार धावा पूर्ण करणारा तो भारताचा तिसरा फलंदाज ठरला आहे. तर सर्वात जलद १२ हजार धावांचा टप्पा गाठणारा जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे. पहिल्या स्थानी भारताचा विराट कोहली आहे, तर आता दुसरं स्थान रोहित शर्माने मिळवलं आहे.

एकदिवसीय इतिहासात सर्वात जलद १२ हजार धावा करणारे फलंदाज

विराट कोहली – २४२ डाव
रोहित शर्मा – २८२ डाव

रोहित शर्माने २८२ डावांमध्ये १२ हजार धावा पूर्ण करत सचिन तेंडुलकरला मागे टाकलं; तेंडुलकरने ३०० डावांमध्ये १२ हजार एकदिवसीय धावा पूर्ण केल्या होत्या. या बाबतीत विराट कोहली अव्वल स्थानावर आहे, ज्याने २४२ डावांमध्ये १२ हजार एकदिवसीय धावा केल्या आहेत.

एकदिवसीय क्रिकेट इतिहासात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू

सचिन तेंडुलकर (भारत) – १८४२६ धावा
विराट कोहली (भारत) – १५०८० धावा
कुमार संगकारा (श्रीलंका) – १४२३४ धावा
रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) – १३७०४ धावा
सनथ जयसूर्या (श्रीलंका) – १३४३० धावा
महेला जयवर्धने (श्रीलंका) – १२६५० धावा
रोहित शर्मा (भारत) – १२०००* धावा