Rohit Sharma sixes record vs West Indies 3rd ODI: मुंबईचा राजा अशी ओळख मिळवलेल्या रोहित शर्माने षटकारांचा अजून एक विक्रम आपल्या नावे केला आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्यात उत्कृष्ट ९१ धावांची खेळी करत रोहित शर्माने इतिहास घडवला आहे. भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर अवघ्या चार धावांत दोन गडी गमावून अडचणीत सापडलेल्या टीम इंडियाला रोहितने सावरलं. त्याने ८५ चेंडूंत ९२ धावांची दमदार खेळी केली, ज्यामध्ये १० चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता.

रोहित शर्माने ऋतुराज गायकवाडच्या जोडीने भारताचा डाव सावरला. शुबमन गिल एक धाव करत तर विराट कोहली गोल्डन डकवर बाद झाला. यानंतर भारताची सुरूवात ढासळली. रोहित शर्माने मैदानावर टिकून राहत संथ खेळी करत मैदानावर सेट झाल्यानंतर फटकेबाजी केली. रोहित शर्मा ९२ धावांवर बाद झाल्याने त्याचं शतक हुकलं. रोहितने बाद होण्यापूर्वी ८५ चेंडूत १०९ चौकार व ३ षटकार लगावले.

रोहित शर्माने इतिहास घडवला

रोहित शर्माने वेस्ट इंडिजविरूद्ध सामन्यात तिसरा षटकार लगावत इतिहास घडवला. रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध १०० षटकार पूर्ण करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. यासह, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन वेगवेगळ्या देशांविरुद्ध १०० किंवा त्याहून अधिक षटकार मारण्याचा पराक्रम करणारा तो जगातील पहिला आणि एकमेव क्रिकेटपटू बनला आहे.

या सामन्यापूर्वी, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध षटकारांचं शतक पूर्ण करण्यासाठी रोहित शर्माला तीन षटकारांची गरज होती. भारतीय डावातील २१व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर एक शानदार षटकार मारून त्याने हा टप्पा गाठला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या त्याच्या या १०० षटकारांपैकी ४७ षटकार एकदिवसीय (ODI) सामन्यांमधील आहेत; याव्यतिरिक्त, कॅरिबियन गोलंदाजांविरुद्ध त्याने कसोटी सामन्यांमध्ये १४ आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३९ षटकार मारले आहेत.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध १३८ आंतरराष्ट्रीय षटकार मारून रोहित शर्माने यापूर्वीच अव्वल स्थान पटकावलं होतं. आता वेस्ट इंडिजविरुद्धही षटकारांची शंभरी गाठून त्याने हा विक्रम एक मोठ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांचा विक्रम आधीच रोहित शर्माच्या नावे आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका विशिष्ट संघाविरुद्ध सर्वाधिक षटकार लगावणारे फलंदाज

१३८ षटकार: रोहित शर्मा (विरुद्ध ऑस्ट्रेलिया)
१३० षटकार: ख्रिस गेल (विरुद्ध इंग्लंड)
१०० षटकार: रोहित शर्मा (विरुद्ध वेस्ट इंडिज)
८७ षटकार: ख्रिस गेल (विरुद्ध न्यूझीलंड)