Rohit Sharma Post Emotional Instagram Story: भारतीय संघाचा माजी कसोटी कर्णधार आणि स्टार फलंदाज रोहित शर्माने इंग्लंड दौऱ्यापूर्वी अचानक इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत निवृत्तीची घोषणा केली. रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर केल्याने चाहत्यांनाही धक्का बसला. अशीच एक इन्स्टा स्टोरी रोहित शर्माने आज म्हणजेच २३ जूनला शेअर केली आहे. रोहितने या स्टोरीमध्ये बीसीसीआयचा लोगो असलेलं हेल्मेट शेअर केलं आहे आणि एक तारीखदेखील टाकली आहे.

रोहित शर्माने सोशल मीडियावर स्टोरी पोस्ट करत अचानक जाहीर केलेल्या कसोटी निवृत्तीनंतर रोहितची पोस्ट पाहून चाहते एका क्षणासाठी पुन्हा घाबरले होते. पण यावेळेस रोहित शर्माच्या पोस्टमध्ये एक खास कारण होतं आणि चाहत्यांनी याबद्दल रोहितला शुभेच्छाही दिल्या आहेत.

रोहित शर्माने २३ जून २००७ या तारखेचा उल्लेख स्टोरीमध्ये केला आहे, जी तारीख तो कधीच विसरणार नाही. रोहित शर्माने आजच्या दिवशी २००७ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. रोहित शर्माने १८ वर्षांपूर्वी २३ जून २००७ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्याने बेलफास्टमध्ये आयर्लंडविरुद्ध पदार्पणाचा एकदिवसीय सामना खेळला होता. सुरुवातीपासूनच रोहित शर्माने आपल्या वादळी फलंदाजीने चाहत्यांची मनं जिंकली.

भारतीय एकदिवसीय कर्णधाराने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये भारतीय संघाचं हेल्मेट आहे आणि त्यावर लिहिलंय, ‘सदैव कृतज्ञ २३.०६.०७’. रोहित शर्माची ही स्टोरी अवघ्या काही मिनिटातच व्हायरल झाली आहे. रोहित शर्माने कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, पण तो वनडे क्रिकेट खेळताना दिसणार आहे.

Rohit Sharma Instagram Story
रोहित शर्मा इन्स्टाग्राम स्टोरी

रोहित शर्माने २७३ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४८.७६ च्या सरासरीने आणि ९२.८० च्या स्ट्राईक रेटने ११,१६८ धावा केल्या आहेत. तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतकं करणारा जगातील एकमेव फलंदाज आहे. त्याची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या २६४ धावा आहे. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोणत्याही खेळाडूने केलेली ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कसोटी क्रिकेटमध्ये रोहितने ६७ सामन्यांमध्ये ४०.५७ च्या सरासरीने ४३०१ धावा केल्या आहेत. २०२४ मध्ये आयसीसी टी२० विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने या फॉरमॅटमध्ये १५९ सामन्यांमध्ये १४०.८९ च्या स्ट्राईक रेटने ४२३१ धावा केल्या आहेत. त्याने टी२० क्रिकेटमध्ये पाच शतकं केली आहेत आणि त्याची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या १२१* धावा आहे.