Rohit Sharma Father In Law Reaction on His Shots Video: मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स सामन्यात मुंबईचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू रोहित शर्मा संघात परतला. रोहित शर्माला स्पर्धेदरम्यान हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली होती, त्यानंतर तो ५ सामने संघाबाहेर होता. यानंतर आता घरच्या मैदानावरील सामन्यात रोहित शर्मा पुन्हा प्लेईंग इलेव्हनमध्ये परतला. रोहित शर्मा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून फलंदाजीला उतरला आणि त्याने शानदार अर्धशतक झळकावलं.

रोहित शर्माने नेहमीपर्माणे सावध सुरूवात केली आणि संधी मिळाल्यानंतर चौकार-षटकारांच पाऊस पाडू लागला. रोहित शर्माने या सामन्यात २७ चेंडूत अर्धशतक झळकावलं. रोहित शर्मा व रायन रिकल्टन या जोडीने पहिल्या विकेटसाठी ६५ चेंडूत १४३ धावांची भागीदारी रचली. लखनौने प्रथम फलंदाजी करताना २२९ धावांचं आव्हान दिलं होतं. रोहित व रिकल्टनने संघाला चांगली सुरूवात करून दिली.

रोहित शर्माच्या चौकारावर सासरेबुवांची भन्नाट प्रतिक्रिया

रोहित शर्माने दुसऱ्या षटकात मोहसीन खानच्या गोलंदाजीवर बॅटची कड घेत चौकार गेला. स्लिपमध्ये खेळाडू असल्याने रोहित बाद होईल का असे भाव सर्वांच्या चेहऱ्यावर होते. पण नशीबाने तो चौकार गेला. रोहितने फटका मारलेला चेंडू चौकारासाठी गेलेला पाहिल्यानंतर त्याच्या सासऱ्यांनी एकच जल्लोष केला. त्यांची रोहितच्या चौकारावरील प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. रोहित शर्माच्या पत्नी रितिका सजदेह देखील निर्धास्त झाली. रोहित शर्मा मैदानावर फलंदाजी करत असताना रितिका पूर्णवेळ फिंगर्स क्रॉस करून बसलेली असते. रोहितच्या प्रत्येक माईलस्टोनवर तिची प्रतिक्रिया पाहायला मिळाते.

रोहित शर्मा बऱ्याच सामन्यांनंतर संघात परतला आणि त्याने धमाकेदार फलंदाजी करत मुंबईच्या विजयाची कहाणी लिहिली. रोहित शर्मा व रायन रिकल्टन यांनी पहिल्या विकेटसाठी १४३ धावांची विक्रमी भागीदारी रचली. यादरम्यान रोहित शर्माने सामन्यात ४४ चेंडूत ६ चौकार व ७ षटकारांसह ८४ धावांची खेळी केली. रोहितचं हे यंदाच्या आयपीएलमधील दुसरं अर्धशतक ठरलं. रोहित शर्मा ८४ धावांवर असताना मनिमरण सिद्धार्थच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळताना झेलबाद झाला. पण रोहित शर्मा व रायन रिकल्टन बाद होईपर्यंत त्यांनी मुंबईला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवलं होतं.

रोहित शर्मा व रायन रिकल्टनच्या खेळीसह आणि नमन धीरच्या फिनिशिंग टचसह मुंबई इंडियन्सने लखनौचा ६ विकेट्सने पराभव केला. लखनौने दिलेलं २२९ धावांचं आव्हान मुंबईने यशस्वीपणे पार केलं. मुंबईची हा आयपीएल इतिहासातील धावांचा यशस्वी पाठलाग केलेली मोठी धावसंख्या आहे. लखनौविरूद्ध विजयासह मुंबई इंडियन्सने प्लेऑफच्या आशा कायम ठेवल्या आहेत.